अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन उत्तर प्रदेशात पळवुन गेलेल्या आरोपीस फरासखाना पोलीसानी केले जेरबंद..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे :
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत एक अल्पवयीन मुलीस तिचे आई वडीलाचे कायदेशीर रखवालीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले बाबत दिनांक ०२/०२/२०२५ रोजी गुन्हा रजि.नं. २५/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा करून सदरचा गुन्हा महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक शितल जाधव याचेकडे तपास दिल्याने त्यांनी तपास सुरु आहे.
अल्पवयीन मुलीबाबत मा. वरिष्ठाचे आदेशाने तात्काळ कारवाई करुन, त्याचा गांभीर्याने शोध घेणेबाबत आदेश असल्याने, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर श्री संदिप सिंगगिल्ल, वांनी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री प्रशांत भस्मे यांना सुचना दिल्याने लागलीच त्याचे अधिपत्याखालील ग्पास पथकातील पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे यांना आदेश दिल्याने सदर बाबत तांत्रिक विश्लेषन करुन, स.पो. फौज महेबुब मोकाशी याना माहिती प्राप्त झाली की, सदर मुलगी सध्याचा ठावठिकाणा हा उत्तप्रदेश राज्यातील मेरठ शहरात आहे. त्याबाबत लागलीच वरिष्ठांची परवानगी घेवुन तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे, सहा. पोलीस फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अंलदार तानाजी नांगरे, गजानन सोनुने, महिला पोलीस अंगलदार रेखा राऊत असे पथक तयार करुन, त्यांना उत्तरप्रदेश राज्यात मेरठ या शहरात पोहचलो. शामनगर झोपडपटटी भागात मुलीचा कसोशीने शोध घेतला असता तीचे सोबत एक इसम मिळुन आल्याने त्याचेकडे सखोल चौकशी करुन, सदर मुलीस लग्नाचे अमिष दाखवुन पळवुन घेवुन गेलेला आरोपी नामे शावेद शब्बीर शेख वय १९ रा. मंगळवार पेठ पुणे यास ताब्यात घेवुन चौकशी अंती वर नमुद गुन्हयामध्ये फरासखाना पोलीस स्टेशन येथे अटक केली, व अल्पवयीन मुलीस तिचे आई वडीलांचे गब्यात सुखरूप देवुन फरासखाना पोलीसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. संदिप सिंहनिल्ल, मा. सहा.पो.आयुक्त फरासखाना विनाग श्रीमती अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजितजाचव, म. सहा.पो.निरी. शितल जाधव, पोलीस उप.निरी. अरविंद शिंदे स.पो.फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, सुनिल भौरे, तानाजी नागरे, गजानन सोनुने, गाँस मुलाणी, नितीन जाधव व महिला पो. अमंलदार रेखा राऊत यांनी केलेली आहे.