अल्पवयीन मुलीला अपहरण करून नेणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत गुन्हे शाखा घटक ०४ वतीने अटक करण्यात यश.. अल्पवयीन मुलीचे सुटका

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २६ उल्हासनगर ठाणे


गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर कार्यालयाकडून उल्हासनगर परिमंडळ ४ कार्यक्षेत्रातील बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हा रजि नं २५०/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम १३७ (२) या गुन्हयाचा संमातर तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर येथील अधिकारी, अंमलदार हे करित असताना अपहरण मुलगी नाव श्रेया दिपक सवाद, वय ४ वर्षे, ६ महिने हिस नमुद गुन्हयातील आरोपीत नाव रंजीत बिसनलाल धुर्वे, वय २६ वर्षे, रा. पोस्ट मोरडोगरी, तहसिल उमरेठ, जिल्हा-छिदवाडा, राज्य मध्यप्रदेश या ठिकाणी घेवुन जात असल्याची गुप्त बातमीदार तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर चे पोलीस पथकासोबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे एक अधिकरी व बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्याचे एक अंमलदार यांना मध्यप्रदेश या ठिकाणी रवाना करण्यात आले असता सदर पथकाने शिताफीने आरोपीला उमरेठ पोलीस ठाणे, जिल्हा-छिदवाडा, राज्य-मध्यप्रदेश यांचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने दि २५ रोजी ताब्यात घेवुन अपहरण मुलीला सुरक्षितरित्या महिला अंमलदार यांचे ताब्यात देवुन वर नमूद गुन्हा दाखल झाले पासून २४ तासाचे आत गुन्हातील आरोपीला पकडण्यात व अपहरण मुलीची सुटका करण्यात यश येवून गुन्हा उघड करण्यात आले.सदरची कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ,सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, उल्हासनगर, शैलेश काळे, सहायक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे (शोच-१) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक/अशोक कोळी, सपोनि/श्रीरंग गोसावी, पोउपनिरी/नागेश्वर मुंडे, पोउपनिरी/अशोक पवार, पोहवा / ३२१६ गणेश गावडे, पोहवा/६६६३ राजेंद्र थोरवे, पोहवा/४४४९ चंद्रकांत पाटील, पोहवा/४५२२ मंगेश जावध, पोहवा/३३४९ चंद्रकांत सांवत, पोशि/३६४९ रामदास उगले असे पोलीस पथकाने केली आहे. तसेच पोलीस निरीक्षक, श्री. संदीप ओंबासे, आरपीएफ एसआयडी, सोलापुर विभाग, मपोउपनिरी/ सोनाली नंदेश्वर, आरपीएफ अंबरनाथ विभाग व आरपीएफ विभाग कल्याण यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट