अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्हयातील आरोपी वागळे काइम ब्रँच, युनिट ५ ठाणेकडुन जेरबंद”

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

ठाणे

कासारवडवली पो. स्टे गुन्हा नोंद क्रमांक ६५५/२०२५ कलम १०३,२३८ भारतीय न्याय संहिता-२०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्हयाचा सर्मातर तपास गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे कडुन करण्यात येत होता. नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले बाबत कळवा पो. स्टे येथे गुन्हा नोंद कर्माक ५९२/२०२५ कलम १३७ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर गुन्हयाचा सखोल तपास करण्यासाठी व.पो. निरी. सलील भोसले यांनी सपोनिरी शरद पाटील, स.पो.उप.निरी/राजेंद्र चौधरी, पो. ना/४१२१ बंडगर, पो.ना/७१५९ तेजस ठाणेकर, पो.शि/ ७५४ यश यादव, असे एक पथक तयार केले. सदर पथकाने नमुद मयत अल्पवयीन मुलगी दि.०४/०७/२०२५ रोजी रहाते घरातुन निघुन गेली त्यावेळीपासुन सी.सी.टी. व्ही फुटेजची तपासणी केली असता नमुद मुलगी ही घरातुन निघुन ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टॅण्ड येथे आल्याचे दिसुन आले. त्याप्रमाणे अधिक माहिती घेतली असता सदरची अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसुन गेल्याचे दिसून आले सदर माहितीच्या अनुषंगाने केलेल्या तांत्रीक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्हयातील सहभाग असल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेवुन रिक्षाचालक समाधान अर्जुन सुर्यवंशी, वय ४० वर्षे, व्यवसाय-ऑटो रिक्षा चालक, रा. सुखशांती चाळ, आंबेडकर पुतळयाचे जवळ, लोकमान्यनगर, पाडा नं. ३, ठाणे पश्चिम यावेकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निषन्न झाल्याने त्यास दि.१०/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर गुन्हाचा पुढील तपास कासारवडवली पो. स्टे कडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी कगेपाटील, सहा. पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप. निरी/चौधरी, पो. हवा/४५२९ निकम, पोहवा/३६३३ शिंदे, पोहवा/४३१५ कार्ले, पोहवा /३५९३ रावते, पोहवा /२२२८ पालांडे, पोहवा /३५५५ काटकर, पो. हवा/२६९९ पाटील, पो. हवा / ३९६७ जाधव, मपोहवा /६६९७ गिते, मपोहवा/७४६७ महाले, पो.ना/७२८ गार्डे, पोना/४१२१ बंडगर, पोना/७१५९ ठाणेकर, पो.शि/२८५० शेडगे, पोशि/८०३३ शिकारे, पोशि/७५४ यादव, या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट