लसीकरणामुळेच माझ्या बालकाचा मृत्यू झाल्याचा महाड तालुक्यातील मातापित्याचा आरोप…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: महाड तालुक्यातील वाघोली आदिवासीवाडी येथील एका सहा महिन्याच्या बालकाचा लसीकरण झाल्यानंतर काही तासात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी घडली आहे.याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी सौ. मालती प्रदीप पवार वय 23 मयत बालकाची आई हिने दिलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील आरोग्य सेविका व एक सहकारी महिला गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी त्यांच्या वाघोली आदिवासी येथील घरी येऊन सेविकेने बालकाला दुपारी 12 चे सुमारास 6 महिन्याचे 3 इंजेक्शन देऊन 2 डोस पाजले तसेच एका गोळीचे 4 तुकडे करून जर बालकास ताप आला तर दुधातून देण्यास सांगितले.

बालक झोपून उठल्यावर रडू लागल्याने फिर्यादी हिने त्यास दुधातून गोळी दिली त्यानंतर बालकाचे हातपाय वाकडे होऊन त्याचे डोळे फिरू लागले असता फिर्यदिनेने ग्रामस्थांच्या मदतीने बालकास प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे आणले परंतु तिथे त्यास मृत घोषित करण्यात आले.

लसीकरणामुळेच आपल्या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मयत बालकाच्या माता पित्याकडून करण्यात येत आहे.

मात्र आरोग्य विभागाने ही शक्यता नाकारली असल्यामुळे
या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

लसीकरण झालेली इतर सर्व बालके व्यवस्थित सुखरूप असून या एकाच बालकाचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप कोडेच असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल ..?

या घटनेचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.एम एस आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री पी पी शास्त्री हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट