संपुर्ण महाराष्ट्रात हातचलाखीने ए. टी. एम. कार्डची अदलाबदली करुन लोकांच्या पैशांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलीसांना यश…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.:-

दि.२७/०९/२०२४ रोजी पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १९४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) प्रमाणे दाखल गुन्हयामधील फिर्यादी भगवान नामदेव हातेकर वय ६७ वर्षे व्यवसाय- मजुरी रा. नेस्ट अपार्टमेंट, बि विंग, रुम नं. ०३, टेंभोडे ता. जि. पालघर हे बँक ऑफ इंडीया, माहिम रोड पालघर ता.जि. पालघर येथील ए. टी. एम. मधुन पैसे काढत असताना तेथे आलेल्या०३ अनोळखी इसमांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी यांना विश्वासात घेवुन त्यांना ए. टी. एम. मधुन पैसे काढुन देतो असे सांगुन हात चलाखी करुन फिर्यादी याचे ए. टी. एम. कार्ड घेवुन फिर्यादी यांना दुसरे ए. टी. एम. कार्ड देवुन फिर्यादी यांचे संमतीशिवाय त्यांचे बँक खात्यातील एकुण ५०,०००/- रुपये काढुन घेवुन फसवणुक केली होती.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना तपास पथक तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. यातील ०३ अनोळखी आरोपीत यांचा शोध घेणेकरीता वरीष्ठांचे आदेश झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलीस पथकाकडुन गुन्हयाचे संमातर तपासादरम्यान शोध चालु असताना पोलीस उप निरीक्षक/रोहित खोत यांना त्यांचे खास बातमीदारांकडुन बातमी मिळाली की, सदर गुन्हयामधील आरोपीत हे बनेली, टिटवाळा या ठिकाणी राहणारे आहेत, त्याप्रमाणे पोलीस पथकाने बनेली, टिटवाळा या ठिकाणी जावुन १) किस्मत बरकतअली शेख वय २७ वर्षे रा. मु.बनेली, ता. कल्याण, जि. ठाणे, २) हसमत बरकतअली शेख वय ३२ वर्षे रा. मु.बनेली, ता. कल्याण, जि. ठाणे, ३) हरेश राहुल प्रधान उर्फ दैत्या वय २१ वर्षे रा. म्हारळ आंबेडकर नगर, बुद्धविहारच्या मागे, ता. कल्याण जि. ठाणे, यांना ताब्यात घेतले असुन त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचा आणखीन एक साथीदार ४) दिपक बिपिन झा रा. रमाबाई आंबेडकरनगर, उल्हासनगर याचेसह केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन गुन्हयामध्ये वापरलेले खालील वाहन व रोख रक्कम जप्त केले आहे.

१) ५,००,०००/- रुपये किमतीची सफेद रंगाची होन्डा सिटी क्रमांक एमएच-०२- सीडी ४४६१ जु. वा. कि. सु. २) ३०,०००/- रुपये रोख रक्कम

एकूण किंमत ५,३०,०००/- रुपये.

वरील आरोपीत हे ए. टी. एम. मध्ये थांबुन ए. टी. एम. धारकांना बोलण्यात गुंतवुण व त्यांचे ए. टी. एम. चा पिन नंबर पाहुन हातचलाखीने कार्ड बदलुन त्याद्वारे इतर ए. टी. एम. मधुन ए.टी.एम धारकांचे पैसे काढत होते. सदरचे आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे हे संपुर्ण महाराष्ट्रात केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन पालघर जिल्हयातील व इतर जिल्हयामधील खालील गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

१) पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १९४/२०२४ भा. न्या.सं. ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

२) पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २६६/२०२४ भा. न्या.सं. ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

३) पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २६८/२०२४ भा. न्या.सं. ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

४) कन्हान पोलीस ठाणे (नागपुर ग्रामीण) गुन्हा रजि. नं. ८०४/२०२४ भा. न्या. सं. ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

५) मुंब्रा पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. १७२४/२०२४ भा. न्या. सं. ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

वरील गुन्हयां व्यतिरिक्त खालील नमुद गुन्हयात आरोपीत हे पाहिजे आरोपीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

१) नारपोली पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. १८३८/२०२४ भा. न्या. सं. ३१८ (४), ३ (५) प्रमाणे.

२) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. २२२/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

३) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ३२१/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

४) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ३५८/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

५) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ३७४/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

६) डॉबविली पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ४८८/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

७) भिवंडी शहर पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. १८१/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

८) भिवंडी शहर पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ३९५/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

९) भिवंडी शहर पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ३९७/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

१०) शिवाजीनगर पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ४९४/२०२३ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

११) ठाणेनगर पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. १०९/२०१९ भा. दं. वि. सं. ३९२, ३४ प्रमाणे.

१२) मुंब्रा पोलीस ठाणे (ठाणे शहर) गुन्हा रजि. नं. ९८८/२०२३ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

१३) वालीव पोलीस ठाणे (मिभाववि) गुन्हा रजि. नं. २१६/२०२४ भा. दं. वि. सं. ४२०, ३४ प्रमाणे.

१४) कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०४/२०२२ भा. दं. वि. सं. १४४, १४७ वगैरे प्रमाणे.

सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउनि/गणपत सुळे, पोउनि /रोहित खोत, पोउनि /रविंद्र वानखेडे, पोहवा./५६० संतोष निकोळे, पोहवा/४४४ विजय ठाकूर, पो. अंमलदार/ २०५ वैभव जामदार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोहवा/९२१ भगवान आव्हाड, पोहवा/सागर राऊत, पोहवा/चंद्रकांत सुरूम नेमणूक पालघर पोलीस ठाणे, पो. अंमलदार/ किशोर पाटील, नेमणूक सायबर सेल, पालघर यांनी यशस्वीस्त्यिा पार पाडलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/दौलत आतकरी नेमणूक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट