अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेला अटट्ल सराईत आरोपी जेरबंद गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची कामगिरी

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक:- दिनांक १५/०६/ २०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ नाशिक शहर चे पथक हे पेट्रोलींग करीत असतांना पो. ना / १८८३ विशाल काठे अशांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, एक इसम छान हॉटेल जवळ, मुंबई आग्रा रोड, भारत नगर रोडवर, नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळालेली आहे. सदरची बातमी वपोनि विजय ढमाळ यांना कळविली त्यांनी सदर बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने सदर ठिकाणी जावुन नमुद पोलीस अंमलदार हे सापळा लावुन थांबले असता बातमीप्रमाणे रात्रौ २०:०० वाजता छान हॉटेल जवळ, मुंबई आग्रा रोड कडुन भारत नगर कडे जाणा-या कच्चा रोडवर, नाशिक येथे एक इसम आला त्यास पकडुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव सनी रमेश दळवी वय ३४ रा. अभिनव रो हाउस नं. सी २, बंदावणेनगर, पवन नगर पाण्याच्या टाकी मागे, कामटवाडे शिवार, नाशिक असे सांगुन त्याचे कब्जात विनापरवाना | बेकायदेशिर रित्या देशी बनावटीचे पिस्तोल (कटटा) मॅग्झीन व त्यातील ०३ जिवंत काडतुस, असे त्याचे ताब्यातील हिरोहोन्डा स्पॅल्डर मोटार सायकल क्रमांक MH 15 CQ 4578 असा एकुण ५१,५०० = ०० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन पोलीस नाईक / १९०० विशाल देवरे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे इसम नामे सनी रमेश दळवी यांचे विरुध्द गु.र.नं. २४२ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सहा. पो. निरीक्षक / हेमंत तोडकर, पो.हवा. / १०९ प्रविण वाघमारे, पो. ना / १८८३ विशाल काठे, पोना / १९०० विशाल देवरे, पो.अं./ २५४४ मुक्तार शेख, पो.अ./ १४०५ आप्पा पानवळ, चालक पो. हवा./ १३१६ नाझीम पठाण अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com