“”-अक्षय तृतीया-“” सणाच्या.. शुभ मुहूर्तावर उ.वि. पोलीस अधि.गोंदिया श्रीमती – रोहिणी बानकर यांनी नागरीकांचे गहाळ झालेले, 50 मोबाईल नागरीकांना परत करून दिली आनंददायी भेट..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

गोंदिया:– विशेष मोहीमे अंतर्गत गोंदिया शहर पोलीसाची उल्लेखनीय कामगिरी

▶️ मानवी जिवन सुसहाय करणारी व सर्व जग हातामध्ये सामावून घेणारी, मानवी जिवानातील अत्यावश्यक झालेली गोष्ट म्हणजेच मोबाईल…….हे बरेचदा नागरीकांकडून कळत.. नकळत अनावधानाने गहाळ होतात…. आणि त्याबाबतची तक्रार नागरीक हे मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणेस नोंदवित असतात….. याच अनुषंगाने मोबाईल गहाळ झाल्याबाबत बऱ्याच तक्रारदार नागरिकांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रारी दिलेल्या होत्या. …

▶️ सदर बाबीची दखल घेत पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया- श्रीमती रोहिणी बानकर मॅडम,यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत व गहाळ मोबाइलचा शोध घेण्याचे निर्देश सूचना दिलेल्या होत्या…..

त्यानुसार वरील बाबींच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार कर्त्यांचे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा गोपनीय बातमीदार आणि शास्त्रोक्त तांत्रीक पद्धत, मदतीच्या साह्याने शोध मोहीम राबवून अथक परिश्रम व सातत्याने प्रयत्न करून विवीध कंपनीचे महागडे एकूण 50 मोबाईलचा शोध घेवून ते मोबाईल परत मिळवण्यात आलेत…



▶️ दिनांक 10/05/2024 रोजी पोलीस ठाणें गोंदिया शहर येथे तक्रार कर्त्यांचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती – रोहिणी बानकर मॅडम, आणि पो.नि. श्री चंद्रकांत सूर्यवंशी, यांचे हस्ते मुळ मालकांना रितसर परत करण्यात आले आहेत… गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे “अक्षय तृतीयाचे सणाचे औचित्य” साधून गोंदिया शहरातील नागरीकांना आनंददायी आणि संस्मरणीय अशी भेट दिली आहे…नागरिकांना हरवलेला मोबाईल परत मिळाल्या बद्दल त्यांचा आनंद द्विगुणित होवून त्यांनी गोंदिया जिल्हा पोलीसांचे आभार मानलेत…. त्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता….

मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनाखाली सदरची उल्लेखनीय कामगिरी गोंदिया शहर चे पो.नि. श्री चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोमनाथ कदम, पोहवा जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, मपोहवा रिना चव्हाण, पोशि कुणाल बारेवार,अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन तसेच सायबर सेल येथील पो.हवा. दिक्षीत दमाहे, प्रभाकर पालांदुरकर, धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केली आहे.

मा. वरिष्ठांनी अथक परिश्रम घेवून गहाळ मोबाइलचा शोध करणाऱ्या अधिकारी अंमलदार यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट