म्हसळा तालुक्यात अक्षता अढागळे हि MPSC राज्यसेवा परिक्षे उत्तीर्ण झालेली पहिली विद्यार्थीनी…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

रायगड : म्हसळा :- अक्षता अढागळे हिचे सुयश MPSC राज्यसेवा २०२२ परिक्षा उत्तीर्ण होऊन म्हसळा तालुक्याचे व आईवडिलांचे नाव मोठे केले आहे. अक्षता अढागळे MPSC परिक्षा उत्तीर्ण झालेली म्हसळा तालुक्यातील पहिली विद्यार्थीनी ठरली असून तालुक्यातुन सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अक्षता अढागळे हिचे वडील अशोक अढागळे हे म्हसळा शहरातील एक भाजी विक्रेते आहेत,एका भाजी विक्रेत्यांची मुलीची उतुंग भरारी घेतली आहे हे कौतुकास्पद आहे.मेहनत व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे हे अक्षता हिने राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे.अक्षता हिचे पहिली ते चौथी शिक्षण रा. जि. प. मराठी शाळा नं. १ मध्ये झाले व पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे अकरावी, बारावी पुर्ण केली, तसेच बॅचलर ऑफ आर्किटेक्चर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे येथे २०१६ मध्ये पदवी घेऊन पुर्ण केले.

चाणक्य मंडल परिवार पुणे अविनाश धर्माधिकारी माजी आय ए एस अधिकार येथुन स्पर्धा परीक्षा तयारी करून MPSC राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र शासनात वर्ग २ हे पद मिळण्याची शक्यता आहे. याचे सर्वस्वी श्रेय मी माझे आई वडील, शिक्षक, माझी बहिण, तसेच श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर या मध्ये प्रमुख मार्गदर्शक कोकण आयुक्त प्रमोद जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले या मुळे मी इथपर्यंत पोहचले असे MPSC परिक्षा विजेती अक्षता अढागळे (लंगोटे) हिने आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

तसेच भविष्यात म्हसळा तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल व तालुक्याचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करेन, मला शिक्षणखात्यात काम करायला नक्कीच आवडेल असे देखील अक्षताने सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट