ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकून ३ लाख २४ हजार ५६०/- रु चा मुददेमाल जप्त करुन ७ आरोपीस केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
अकोट :

मा.श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदयांचे रामूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आले.
दि.२६/०७/२०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलीसांना माहीती मिळाली की, अकोट बोर्डी रोडवरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेतालगत असलेल्या खोपडी जवळील झाडाखाली काही इसम पैशाचे हारजीतवर जुगार खेळत आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून दोन पंचासमदा सदर ठिकाणी जुगार रेड केला असता त्या ठिकाणी १) शेठा अक्रम शेख मुस्तफा वय ४६ वर्षे रा.इक्तेखार प्लॉट अकोट २) अन्वर अली खुर्शीद अली वय ५० वर्षे रा. ताहपुरा, अकोट ३) समीर खान शेर खान वय ३५ वर्षे रा. खतीब पुरा अकोट ४) मोहम्मद सलीम मोहम्मद अकबर यय ३३ वर्षे रा. टेकडीपुरा, अकोट ५) शेख अयुब शेख सत्तार वय ४२ वर्ष रा. गाजी प्लॉट, अकोट ६) मोहम्मद अकील मोहम्मद मुजेदार वय ४० वर्षे रा. बडा अलावा अकोट ७) फिरोज अली जमीर अली वय ४१ वर्षे रा. गाजी प्लॉट, अकोट असे इमस पैशाचे हारजीतयर जुगार खेळतांना मिळून आले. वरील सर्वांचे अंगझडतीत व डावावर एकुण ३५६०६रु तसेच ०६ मोबाईल कि.७१,०००६- एकुण ०४ चार मो. सा. कि. २,५०,०००/- अशा एकूण ३,२४,५६०/-रु वा माल मिळून आला. पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्टांचे मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, अर्चित चांडक साहेब यांचे आदेशान्वये मा. अपर पोलीस अधिक्षक, रेही सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट पडघन साहेब यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, पोहेका उमेश सोळंके, पोहेका हरीष सोनवणे, पोहेका शिवकुमार तोमर, पोहेका वासुदेव ठोसरे, पोका राजेश माळेकर, पोका सुनिल पाटील यांनी केली.