अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील१२ हजार रु चा देशी दारूचा साठा जप्त करुन आरोपी राजेश जयस्वाल याला घेतले ताब्यात

सह संपादक -रणजित मस्के
अकोला


मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.
आज दि. 26/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून पथकाने शासकीय वाहनाने पो स्टे अकोट ग्रामीण हद्दीतील ग्राम शिवपुर येथे पंचासमक्ष देशी दारूची रेड केली असता, आरोपी नामे राजेश कमलनारायण जयस्वाल वय 55 रा. शिवपुर ता. अकोट जि अकोला याचे ताब्यात देशी दारू टैंगो पंच 90 एम एल चे 321 नग किंमत 12,440/- र चा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र दारुबंदी कायाद्यान्वये पो स्टे अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, PSI विष्णू बोडखे, अंमलदार Hc सुलतान पठाण, Hc प्रमोद ढोरे, PC सतीश पवार, Dpc देवानंद खरात, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.