अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात एम.पी.डी.ए., मोक्का तसेच हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सह संपादक -रणजित मस्के
अकोला



आज रोजी दिनांक २६.०७.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे एम.पी.डी.ए., मोक्का हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा वे आयोजन पोलीस अधीक्षक, अकोला मा. श्री अर्चित चांडक सर यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आले होते, सदर कार्यशाळा करीता एमपीडीए कायदयांतर्गत अंमलबजावणीचा प्रदिर्घ २० वर्षाचा अनुभव असलेले तसेच १००० पेक्षा जास्त एमपीडीए प्रस्ताव दाखल केलेले नागपूर क्राईम ब्रच चे पोउपनी. श्री राजेश पैदलवार यांनी एम.पी.डी.ए., मोक्का, हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही या विषयावर सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्रश्न उत्तर सत्र घेउन शंका चे निरसन केले,
सदर प्रशिक्षणाकरीता अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. चंद्रकांत रेही, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोनि स्थागुशा श्री. शंकर शेळके तसेच पोस्टे प्रभारी अधिकारी तसेच अधिनस्त प्रतिबंधक कार्यवाहीचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार तसेच तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील श्री. मिलिंद इंगळे, तसेच श्री. चिथि अधिकारी कंकाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे शेवटी लाभलेले प्रशिक्षक श्री पोउपनि राजेश पैदलवार, काईम ब्रांच नागपुर यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्या बददल मा पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले व शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री गणेश जुमनाके राखीव पोलीस निरीक्षक यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. आनंद महाजन प्र. पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी केले तर सूत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.