अखिल महाड तालुका वारकरी संप्रदाय तर्फे स्वच्छता मोहीम

महाड प्रतिनिधी-रेशमा माने
महाड – दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी अखिल महाड तालुका वारकरी सांप्रदाय तर्फे महाड येथील तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा मंत्र सर्वांनी अमलात आणावा या करता शासकीय कार्यालयात पासून या मोहिमेची सुरुवात आपण करीत आहोत असे ह.भ.प.सचिन सागवेकर यांनी सांगितले.

या मोहिमेचे निमंत्रण महाड चे तहसीलदार माननीय काशिद साहेब यांना देण्यात आले होते. त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.शंकर महाराज बिरवाडी, ह.भ.प.केशव महाराज गांधारपाले, ह. भ.प.दत्ता महाराज घाणेकर गांधारपाले,ह.भ.प. भरत महाराज पवार महाड ,श्री सुभाष जाधव यांचे सहकार्य लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com