एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या वेळेस घुसून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद स्था. गुन्हे शाखेची कामगीरी..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
पारगाव का. पोस्टे गु.र.नं १३/२०२५ भा.न्या.सं कलम ३०९(४),३३१(४),३०५(A),३(५) नुसार दाखल होता.फिर्यादी नामे सविता चंद्रकांत पोंदे वय ४५ वर्ष रा.पोंदेवाडी ता.आंबेगाव जि.पुणे ह्या आपल्या शेतातील घरात एकट्या राहत असून दि.२५/१/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या वेळेस तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती.सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला मा.पोलिस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो यांनी दिल्या होत्या.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच मार्फत समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की काठापूर येथे राहणाऱ्या अंकुश बबन करंडे रा.काठापूर, आंबेगाव जि.पुणे याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केला आहे.मिळालेल्या बातमीवरून सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याने त्याचा साथीदार जळगाव वरून ऊस तोडणी कामी पारगाव येथे आलेल्या राहुल भास्कर पाटील रा.टिटवी ता. पारोडा, जि. जळगाव तसेच फिर्यादीशी पूर्वी पासूनची ओळख असलेली महिला नामे अश्विनी उर्फ सोनी राजु पवार रा. पिंपरखेड ता. शिरूर जि. पुणे यांच्या सोबत मिळून सदर चा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी त्यांना पारगाव कारखाना पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.सदर ची कारवाई मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सो, अप्पर पोलिस अधीक्षक श्री रमेश चोपडे सौ यांच्या मार्ग दर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर
सपोनि. दत्तात्रय मोहिते
सफौ.दीपक साबळे
पोहवा.राजु मोमीन
पोहवा.संदीप वारे
पोहवा. अजित भुजबळ
पोहवा. हेमंत विरोळे
पोशी अक्षय नवले
पोशी निलेश सुपेकर यांनी केली आहे.