एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भरतीपूर्व मुलाखतीचे एकदिवशीय प्रशिक्षण मोफत शिबीराचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:-समितीचे सह सरचिटणीस प्रविण शिंदे यांच्या संकल्पनेतून एअर इंडिया मॉडर्न स्कुल कलीना येथे घेण्यात आले.

शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. समितीच्या कार्याची माहिती उल्हास बिले यांनी दिली. स्थानीय लोकाधिकार समिती चे कार्य काय असते हे उपस्थिताना प्रशांत सावंत, बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

शिबिरार्थीना श्री. कैलाशजी बिधलान व स्कायझोन एविएशन च्या अनामिका माने, सीमा मॅडम, पल्लवी मॅडम व सौरभजी त्याचप्रमाणे समितीचे चिटणीस अजित चव्हाण यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले .शिबिराला १०९ उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी सलील कोटकर, सुनिल निंगावले, अमोल कदम, दिपक शिंदे, जितू भाटकर, उप शाखाप्रमुख रामकृष्ण आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला हॉल ची व्यवस्था मॉडर्न स्कुल चे चेअरमन श्री. शशिकांत साळुंखे यांनी केली होती. कार्यक्रमाला ace बँकेचे चेअरमन मिलींद घाग आणि संचालक निलेश लांजेकर, नरसिंह पाटील व उमेश सानप, तसेच कंज्यूमर सोसायटीचे संचालक भिकू भडवलकर व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट