वायुसेना कामगार कॅम्प येथील हॅन्ड ग्रेनेड सुरक्षितरित्या विमानतळ पोलीसांनी निरस्त (डिफ्युज) केले बाबत.
पुणे
सह संपादक – रणजित मस्के
आज दिनांक 22/5/2025 रोजी 12.30 वाजता वायुसेना सिक्युरिटी ऑफिसर, लोकेंदर सिंग यांचेकडून प्राप्त माहिती नुसार लेबर कॅम्प पटांगणात एक हॅन्ड ग्रेनेड जुना गंजलेला स्थितीत मिळून आला आहे.
त्यानुसार तात्काळ विमानतळ पोलिस ठाण्यात पथक, बीडीडीएस पथक तसेच वायुसेना पोलीस यांचे सह सदर ठिकाणी जाऊन सदरचा हॅन्ड ग्रेनेड सुरक्षित रित्या तपासणी करून सदरचा परिसर रिकामा करून हॅन्ड ग्रेनेड सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यास स्फोटक लावून त्यास निरस्त (डिफ्युज) करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री हिम्मत जाधव साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, मा. प्रांजली सोनवणे मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आशालाता खापरे पोलीस निरीक्षक, (गुन्हे)विमानतळ पोलिस ठाणे व पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस निरीक्षक येळे, बीडीडीएस पथक पुणे, वायुसेना पोलीस यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
माहितीस्तव सादर
आशालता खापरे
पोलीस निरीक्षक (गुन्हे)
विमानतळ पोलिस ठाणे,
पुणे शहर