ग्रुपग्रामपंचायत बामणोली येथे अविश्वास ठराव मजूर झाल्यानंतर आज नवनिर्वचित सरपंच पदी सुवर्णा सकपाल यांची बिनविरोध जाहीर……

0
Spread the love

ग्रुपग्रामपंचायत बामणोलीवर आज महाविकास आघाडीचा झेंडा पडकला…

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड

रायगड :- माणगांव तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत बामणोली येथे आज सरपंच पदाचा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी बामणोली मागवली व कलमजे या गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये बामणोली ग्रामपंचायत सरपंच सौ. सुवर्णा राजेंद्र सकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माणगांव तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी सुवर्णा राजेंद्र सकपाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली सुवर्णा सकपाळ यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.निवडणूक कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा सामाजिक ताणतणाव निर्माण नं होवो यासाठी माणगांव पोलीस ठाण्यातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पो. ह.रावसाहेब कोळेकर, पो. शि. रामनाथ डोईपोडे, देवकुलकर, मयूर पाटील अभिषेक साटम अशी टीम तैनात ठेवण्यात आली होती.

बामणोली ग्रामपंचायतिच्या सरपंच स्नेहा खाडे यांच्या वरती मागील काही महिन्यात सद्यास्थांनी अविश्वास ठराव ठाकल्या नंतर त्यांनी आपलं सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्याच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज ग्रुप ग्रामपंचायत बामणोली येथे सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी सुवर्णा राजेंद्र सकपाळ यांनी एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अर्जुन जमखडी, ग्रामसेवक अजय येलवे व तलाठी सतेरे मॅडम यांनी सुवर्णा सकपाल यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी ग्रामपंचायत चे आजी माजी सरपंच सद्यस्थ्य व गावकरी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी गावातून भव्य मिरवणूक काढत सुवर्णा सकपाळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वीचीत सरपंच सुवर्णा सकपाळ यांनी गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासला कधीही तडा जाऊ नं देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली तसेच माझ्या सोबत ग्रामपंचायत आजी सद्यस्थ्य उज्वला पाखुर्डे, स्वाती पाखुर्डे, साक्षी दळवी, रंजना कोळी,सुशांत पडवळ,उपसरपंच मंगेश पवार, तसेच किंगमेकर मुकुंद वाढवलं, युवा नेते शैलेश पाखुर्डे, प्रवीण पाखुर्डे, माजी सरपंच बाबू पाखुर्डे, सद्यस्थ्य राकेश वाढवलं, प्रशांत वाढवलं, राजेंद्र सकपाळ, राजा मालोरे, सुभाष मालोरे, दाजी करकरे, नथुराम दळवी, सखाराम पवार, गोविंद पवार, पोलीस पाटील हरी पवार, अनंत सुतार, महेंद्र वाढवलं, हरेश गजमल महादेव पवार धनराज पवार,हरिश्चद राऊत, बाळा वाढवलं यांच्या उपस्थितीमध्ये आज माजी सरपंच पदाचा निवड निकाल जाहीर झाली याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी नवंनिर्विचत सरपंच सुवर्णा राजेंद्र सकपाळ यांनी दिली.व आभार व्यक्त केले..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट