अंमली पदार्थ छापा कारवाईमध्ये ८२,९९०/- रुपये किंमतीचा ४ किलो १४४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कोल्हापूर ;

अंमली पदार्थ काळे रंगाच्या बँगेतुन घेऊन आलेल्या आरोपी यांना केलेग जेरबंद

करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकांची कारवाई

पोलीस ठाणे

करवीर पोलीस ठाणे

गुन्हा रजि.नं व कलम

६९/२०२५

फिर्यादी नांव व पत्ता

गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २०ii (ब) २९ प्रमाणे सुजय शांताराम दावणे, पोहेकॉ १७९६, नेमणुक करवीर पोलीस ठाणे, कोल्हापूर

गु. घडला ता व वेळ

दि.१०/०२/२०२५ रोजी चे सुमारास संकल्प सिध्दी अपार्टमेंटच्या पश्चिमेस असले मोकळ्या माळावरील पडक्या खोलीजवळ उघड्यावर ता. करवीर कोल्हापूर येथे जप्त मुद्देमाल

१) ३१,७००/- रु त्यामध्ये एक गुलाबी रंगाचा प्लॅस्टीकचा कागद गुडाळलेला पुडा त्यामध्ये हिरवट पाने फुले, काडया व बिया संलग्न असलेला उग्र वासाचा सुट्टा गाठी झालेला सुका १ किलो ५८५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृष्य अंमली पदार्थ मि.की.स

२) ५०,७७०/- रु. त्यामध्ये एक प्लॅस्टीकचा कागद त्यास खाकी रंगाची टेप गुंडाळलेला पुडा त्यामध्ये हिरवट पाने फुले, काडया व बिया संलग्न असलेला उग्र वासाचा सुट्टा गाठी झालेला सुका २ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा सदृष्य अंमली पदार्थ मि.की.स

३) ४२०/- रु त्यामध्ये एक प्लास्टीकची पिशवीमध्ये २१ ग्रॅम वजनाचा हिरवट पाने फुले, काडया व बिया संलग्न असलेला उग्र वासाचा सुट्टा गाठी झालेला सुका २१ ग्रॅम वजनाचा गांजा सदृष्य अंमली पदार्थ मि.की.स

४) १००/-रु त्यामध्ये एक काळ्या रंगाची बंद असलेली व त्यास चैनची कप्पे असलेली बंग तसेच पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीकचे गोणी (पोते) जुवाकिंस

८२,९९०/- रुपये

कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडीत सोो
मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई सो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुजितकुमार क्षीरसागर सोो यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिंदे, पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे, पोलीस अंमलदार विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे, राहुल देसाई, सुभाष सरवडेकर, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, योगेश शिंदे, विजय पाटील, अविनाश कांबळे, अक्षय पोवार, मुरलीधर लांघी निष्पन्न आरोपीचे नांव व पत्ता

१) साजिद उर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख, वय २४, रा. यादव कॉलनी, सरनाईक नगर, जवाहरनगर, कोल्हापूर २) आफताब अब्दुलकादर खान, वय ४२, रा. विजयराज हॉटेल समोर, ई वॉर्ड, ६०, सदरबाजार, कोल्हापूर सध्या रा. प्लॉट नं. ५०१, संकल्प सिंध्दी अपार्टमेंट, पुईखडी, ता करवीर, जि. कोल्हापूर

हकीगत :- दि. १०/०२/२०२५ रोजी करवीर पोलीस ठाणे हीतील पाडळी गांवचे हीत असले संकल्प सिध्दी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजुस असले मोकळ्या माळावरील एका पडक्या खोलीजवळ एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवुन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी पोहेकॉ १६८० पाटील यांना मिळाली त्याप्रमाणे मा पोलीस निरीक्षक सोो, किशोर शिंदे, नेम करवीर पोलीस ठाणे हे स्वताः व पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असे मिळाले बातमीच्या ठिकाणी संकल्प सिध्दी अपार्टमेंटच्या पश्चिमेस असले मोकळ्या माळावरील पडक्या खोली पाठीमागे आडोसा घेऊन सापळा लावुन थांबलो असता पडक्या खोलीजवळ थोड्या वेळांनी बातमीदाराने सांगितले वर्णनाचा इसम आला त्याचा संशय आलेने त्यास तेथेच ताबेत घेऊन त्यास त्याचे नांव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव आरोपी क्र. १ साजिद उर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख असे सांगितले त्याचेकडे असलेली काळे रंगाची बँग चेक केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असलेले दोन पुडे त्यातील एका पुड्यात १ किलो ५८५ ग्रॅम, दुसऱ्या पुड्यात २ किलो ५३८ ग्रॅम व एक पारदर्शक पिशवी त्यात २१ ग्रॅम वजनाचा असा एकुण ४ किलो १४४ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आलेने त्यास गांजासह ताबेत घेतले व त्यास गांजा कोणी पुरविला असे विचारले असता त्याने आरोपी क्र. २ आफताब अब्दुलकादर खान असे सांगितलेने त्यास ही क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातुन ताबेत घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट