आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अवघ्या ०५ दिवसांत रात्रीची घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या…

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिष्टर कमांक १९४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४),३०५ प्रमाणे दि.०६/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी वेतन रमेश बौगुले रा. वडगाव आनंद ता. जुन्नर जि.पुणे हे त्यांच्या कुटुंबासह राहत्या घरात झोपलेले असताना रात्रीच्या वेळी दि.०५/०७/२०२५ रोजी २३/०० वा.ते दि.०६/०७/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा. वे दरम्यान अज्ञात चोरटयांनी अनाधिकृतपणे खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण २,५०,०००/- चोरी गेले होते तसेच त्यांचे जवळ राहणारे प्रशांत अनंतराव चौगुले रा. वडगाव आनंद ता. जुन्नर जि.पुणे यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील चांदीचे भांडी व रोख रक्कम असा एकुण २,६६,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता असा दोन्ही घराचा मिळून एकुण ५,१६,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता. सदरची घटना त्यांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर समजली असून त्याबाबत चेतन रमेश चौगुले यांनी पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या वतीने सुरू करण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक साो. यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दुष्टीने मार्गदर्शन केले होते. एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने वडगाव आनंद परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. त्याची गंभीर दखल घेवून पोलीसांनी गुन्हयाचा कसोशिने तपास चालू केला.
सदर गुन्हयाच्या तपासकामी आळेफाटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी अतिशय चिकाटीने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीगार यांच्या सहाय्याने सदरचा गुन्हा हा करतेवेळी आरोपीनी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यातील आरोपी यांना एकएक करून शिरूर जि.पुणे तसेच नेवासा जि.अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलेले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.. १) सोमनाथ भिमनाथ बामणे वय ३७ वर्षे रा. गुणवंतवाडी ता. गुनाट ता. शिरूर जि.पुणे, २) संदिप कैलास भालेराव वय २८ वर्षे रा. सुरेगाव (गंगा) ता. नेवासा जि. अहिल्यानगर, ३) संदिप बबन धोत्रे वय ३७ वर्षे रा. पोस्ट ऑफिस जवळ, न्हावरा ता. शिरूर जि.पुणे, ४) श्रीमंत जिवलाल बव्हाण वय ५२ वर्षे रा. देऊळगाव मोठ्या तलावाजवळ देऊळगाव सिध्दी ता.जि.अहिल्यानगर, ५) आकाश लकडया भोसले वय १९ वर्षे रा. हुकुम कॉलनी, पारधी वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ शिरूर जि. पुणे नमुद आरोपींना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांनी गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी नंबर MH 12 WX 8208 व गुन्हयात चोरी केलेली १८०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकूण १२,००,०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी हि श्री संदिपसिंह गिल्ल साो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. रमेश चोपडे साो. अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा. रविंद्र चौधर साो. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. जुन्नर विभाग, श्री. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.पुणे आ. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुबनांप्रमाणे आळेफाटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथकातील स.पो.नि मोहिते, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, अनिल पवार, सहा. फौजदार दिपक साबळे, पो. हवा अमित मालुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, राजु मोमीन, संदिप वारे, विकम तापकीर, पो.कॉ. नविन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप, अक्षय नवले, अमोल शेडगे, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, धीरज जाधव, वैभव सावंत यांनी केली आहे.