राजस्थानप्रमाणे “वकिल संरक्षण कायदा- २०२३” महाराष्ट्रातही लागु करण्याबाबत Adv. श्री. अमर घोसाळे यांचे बोरीवली बार असोसिएशनला निवेदन…

0
Spread the love

संपादक – श्रीमती दिप्ती भोगल

मुंबई :– Adv. श्री. अमर भगवान घोसाळे यांनी सांगितल्याप्रमाणे ते दिनांक २७/१२/२०२३ रोजी श्री क्षेत्र मच्छींद्रनाथ देवस्थान, सावरगाव ता. अष्टी, जि. बीड येथे गेले असता त्यांना ट्रस्टींनी परवानगी देऊन सुद्धा मंदिरातले पुजारी नवनाथ आहेर यांनी मंदिरात प्रवेश करण्यास मनाई केली.

सदर घटनेबाबत Adv. श्री अमर यांनी त्यांना पोलिसांना बोलवा किंवा असा नियम कोठे आहे हे सांगा असे म्हटल्यावर त्यांनी पोलिसांना न बोलवता गावगुंडांना बोलवले व सदर घटना त्यांच्या मित्राच्या मोबाईल वर शूट करत असताना त्या गावगूंडानी Adv अमर यांना जोरात फाईट मारली त्यामुळे त्यांच्या हातातला मोबाईल खाली पडून फुटला. पून्हा त्यांच्या अंगावर मारायला धावून आल्यावर तेव्हा त्यांची आई मंगला, वय वर्षे ६६ मारु नका, मारू नका असे म्हणत मधे आली तर तिलाही त्या गावगुंडानी मारले.

सदर घटनेची तक्रार अंभोरा पोलिस ठाणे, अष्टी तसेच बीड जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक यांना केली असल्याचे Adv श्री अमर घोसाळे यांनी सांगितले.

तसेच Adv श्री. अमर घोसाळे हे बोरिवली अॅडव्होकेट बार असोसिएशनचा Life member असून त्यांच्या सोबत जी घटना घडली आहे अशी दुर्दैवी घटना भविष्यात त्यांच्या सारख्या वकिलांसोबत होऊ नये म्हणून राजस्थान राज्यात लागू झालेला वकिल संरक्षण कायदा २०२३ महाराष्ट्रातही लागू व्हावा यासाठी आपण कायदेशीर तरतूदीप्रमाणे Adv . श्री. अमर घोसाळे यांना मदत करावी अशी विनंती बोरीवली बार असोसिएशनचे अध्यक्ष यांना केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट