दुहेरी हत्याकांडांतील अडीच वर्षांपासुन फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा, युनिट ६ ने केला जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंधक कारवाया तसेच पाहिजे व फरारी आरोपीचा शोध घेणेबाबत वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे आज दिनांक २२/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस उप-निरीक्षक दळवी, पो.अं. ताकवणे, पो.अं. व्यवहारे, पो.अं. पवार यांनी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं २०/२०२२, कलम ३०२, ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ भा.द.वि. सह आर्म अॅक्ट कलम ३(२५). ४(२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३.७ सह महा. पोलीस कायदा कलम १३५. ३७ (१) (३) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रन अधिनियम कलम ३ (१) (1) (३) (२) या गुन्हयातील अडीच वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे ऋग्वेद जालिंदर वाळके वय २३ वर्षे, यास पेरणे टोलनाका शेजारी सागर हॉटेल जवळ, पैरणे, ता.हवेली, जि. पुणे येथुन सापळा रचुन ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीविरूद्ध यापुर्वी खून, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे इत्यादी गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक कांबळे, उप-निरीक्षक दळवी, पो. हवा ६७८१ /सकटे, ६८३५/मेमाणे, पो.ना. ७३१७/मुंढे, ७८०५/कारखेले, पो. अं.८१५९/ताकवणे, २६८८/व्यवहारे, ८२०३/पवार, पो.अं.१०४५२/काटे, १०४१९/घाडगे, ४४७६/तनपुरे, मपोअं. ९४७९/पानसरे, मपोअं. १००४ मांदळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट