अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया, पदी मा. श्री. नित्यानंद झा,(I.P.S.) यांनी पदभार स्वीकारला…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:- वर्ष 2019 तुकडीचे (I.P.S.) अधिकारी मा.श्री. नित्यानंद झा, यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेली असून अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे………आज दिनांक 23-11-2023 रोजी नव्याने रुजू झालेले मा. श्री. नित्यानंद झा,(I.P.S.) यांनी अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया पदाचा पदभार मा. श्री. अशोक बनकर यांच्या कडून स्विकारलेला आहे…
🔹 नुकतेच दिनांक 20-11-2023 ला महाराष्ट्र शासन गृहविभागाने पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते……. त्यात गोंदिया चे अप्पर पोलीस अधीक्षक, मा. श्री. अशोक बनकर, यांचा गोंदिया जिल्ह्यातील दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि त्यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र,जालना येथे करण्यात आली असल्याने त्यांच्या ठिकाणी मा. श्री. नित्यानंद झा, यांची नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे……
🔸 माननीय पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी भागातील गोरगरीब जनतेच्या हिताकरिता राबविण्यात येत असलेले कम्युनिटी पोलीसिंग, पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे नावीन्य- पूर्ण उपक्रम राबवून देवरी, सालेकसा, अर्जुनी- मोर, तालुक्यातील आणि गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्यात मा. श्री. अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया म्हणून सिंहाचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com