समाजविघातक कृत्य केल्यास होणार कारवाई
उपसंपादक – रणजित मस्के
नंदुरबार – शहादा :- शहादा राज्यातील विविध शहरात ताणायाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शहादा शहरासह तालुक्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहेत. कुणीही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, सामाजिक तेढ निर्माण होईल, असा कोणताही मजकूर, फोटो समाजमाध्यमावर प्रसारीत केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावमय परिस्थिती आहे. कोल्हापूरसह इतर शहरात आंदोलन सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अलर्ट होत नागरिकांना आवाहन केले आहे. सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारीत करु नये, तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा पोलिसांकडून देण्यात
आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील, असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एस.एम.एस. तयार करुन प्रसारित करणाऱ्यांच्या कृत्यांवर पोलीसांची करडी नजर असून, अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. सोशल मीडिया पेट्रोलिंग ही व्यवस्था सुरू असल्याचेही ते म्हणाले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com