निष्काळजीपणे विद्युत करंट लावून मरणास कारणीभूत ठरणाऱ्या विरूद्ध गुन्हा नोंद, एकास अटक, पो. ठाणे आमगाव पोलिसांची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक २७/०७/२०२३ रोजी  मौजा मानेगाव, गडमाता मंदीराजवळील जंगलात एक व्यक्ती पडून आहे. अशी पोलीस पाटील मानेगाव संजु फुंडे यांच्या कडुन माहीती मिळाली होती त्यावरुन संबंधीत बिट चे अंमलदार पो.हवा राजेश शेन्द्रे यांनी याबाबत वरिष्ठांना माहीती कळवुन स्टाफसह घटनास्थळी दोन प्रतिष्ठीत नागरिक, गावातील सरपंच, पोलीस पाटील, विद्युत विभागाचे तंत्रज्ञ, वनविभागाचे बिट वनरक्षक यांच्या सोबत पोहचून सागाचे झाडाचे मधात मृत स्थितीत एक ईसंम जमीनीवर पडले असल्याचे दिसुन आल्याने शहानिशा करून मृतक  आकाश राजेश कोहळे, वय २३ वर्ष, रा. मानेगाव असल्याची त्याचे मामा यशवंत श्रीराम नेवारे, वय ३७ वर्ष, रा. मानेगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया यांचेकडून खात्री करून पंचनामा कार्यवाही करून मृतकचे प्रेत ग्रामीण रुग्णालय, आमगाव येथे नेण्यात आले असता वैद्यकिय अधिकरी यांनी त्यास तपासून मृत घोषीत केल्याने मृतकाचे मामा यशवंत श्रीराम नेवारे  यांचे तक्रारीवरून आकाश राजेश कोहळे, वय २३ वर्ष, रा. मानेगाव हा विद्युत करंट लागुन मरण पावला असल्याचे रिपोर्ट वरुन पो.स्टे आमगाव येथे दि. २७/०७/२०२३ रोजी अकस्मात मृत्यू क्रमांक ३९/२०२३ कलम १७४ जा. फौ. अन्वये दाखल करण्यात आला होता.

        पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री. किशोर पर्वते, यांनी प्रस्तुत मर्गचे सखोल चौकशी करून सत्यता पडताळून आवश्यक कायदेशिर कारवाई करण्याबाबत पो. नि. पो.स्टे. आमगाव श्री. युवराज हांडे यांना निर्देशीत केले होते.

      या अनुषंगाने सदर अकस्मात मृत्यूचे गूढ ची सत्यता पडताळण्याकरीता पो.नि. पो.स्टे आमगाव यांनी चौकशी अधिकारी यांना सूचना दिलेल्या होत्या. चौकशी अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ ठिकाणची सूक्ष्म पाहणी, पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा कारवाई तसेच घटनेसंबंधी आवश्यक पुरावा गोळा करून घेतलेल्या प्रत्यक्षदर्शी आणि साक्षदार लोकांचे बयानाच्या आधारे असे निष्पन्न झाले की, दिनांक २६/०७/२०२३ रोजी १५.०० वा पासुन ते दिनांक २७/०७/२०२३ चे ०९.०० वा पर्यंत बसंता बाई वल्द केशोराव गेडाम यांचा गोदीपुत्र अशोक मडावी, वय अंदाजे २६ वर्षे, दुर्गेश बिहारी, वय अंदाजे ३५ वर्ष, राधेश्याम देवराम ठाकरे, वय ४० वर्षे व मृतक अशोक कोहळे, रा. मानेगाव, ता. यांनी जंगली डुकरे मारण्या करीता पांडेबाईच्या शेतात खुंट्या गाडून त्यावर सेन्ट्रिंगचे तार लावले व मानेगाव गावाचे थ्री फेज इलेक्ट्रिक पोलच्या ताराला गडमाता मंदीराकडे जाणारा सिंगल फेज व न्युट्रल ताराला वायरने जोडून पांडेबाईच्या शेता पर्यंत गेलेल्या वायरला वायर जोडून निष्काळजी पणाने सेन्ट्रिंगचे तारा मध्ये विद्युत प्रवाह सुरु केले. जंगली डुकरे मारण्यासाठी त्यांनी लावलेल्या करंट मध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो हे माहित असताना सुध्दा त्यांनी करंट लावल्याने त्यामध्ये आकाश राजेश कोहळे याला विद्युत करंट लागूनतो मरण पावला. तो मरण पावल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने 1)अशोक मडावी, 2)दुर्गेश बिहारी, व 3) राधेश्याम ठाकरे यांनी सेन्ट्रिंग तार व वायर फेकून दिले व मृतकचे शरीर महादेव पहाडी गडमाता मंदीराचे मागे इलेक्ट्रिक पोल जवळील सागाच्या झाडाचे मध्ये ठेवून पळून गेले. असे चौकशीअंती निष्पन्न झाले. तपासी अंमलदार पो.हवा. राजेश शेंद्रे यांचे अहवालावरुन वसंताबाई वल्द केशोराव गेडाम यांचा गोदीपुत्र -

1) अशोक मडावी, वय अंदाजे २६ वर्षे, व

2) दुर्गेश बिहारी, वय अंदाजे ३५ वर्षे,

3) राधेश्याम देवराम ठाकरे, वय ४० वर्षे, सर्व रा. मानेगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया

           यांचेविरुद्ध मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली  पोलीस स्टेशन आमगाव येथे दिनांक ०३/०८/ २३ रोजी अप. क्र. २५२ /२३, कलम ३०४, २०१, ३४ भादंवि, सहकलम १३५ भारतीय विद्युत कायदा, सहकलम वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६), (अ) ,(ब), ९, ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी राधेश्याम देवराम ठाकरे वय 40 वर्षे राहणार मानेगाव तालुका - आमगाव यास अटक करण्यात आली आहे.  ईतर दोन आरोपी यांचा शोध घेण्यात येत असून सदर गुन्हयाचा पुढिल तपास पो उप नि. खेडकर करीत आहेत.

        सदरचे अकस्मात मृत्यूची चौकशी मा.पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प- देवरी श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक, आमगाव श्री युवराज हांडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पो. हवा. राजेश शेंद्रे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट