हातभट्टीची दारू काढणाऱ्या जोडप्यावर पो. स्टे. गंगाझरी पोलिसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🎯 मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा, श्री. प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. श्री. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध व गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध कारवाईची मोहीम
राबविण्यात येत आहे .
या अनुषंगाने पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अंमलदार हे दिनांक 30/10/2023 रोजी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा बरबसपुरा ता तिरोडा जिल्हा गोंदिया येथील नाल्याजवळ एक जोडपे जमिनीत खड्डा खोदून त्याची चूल तयार करून, त्या चुलीवर मोठा टीनाचा ड्रम व त्यावर एक मोठे जर्मन घमेले ठेवून मोहाफुलाची हातभट्टी दारू काढत असल्याचे मिळून आले. सदर ठिकाणी पोलिसांनी रेड कार्यवाही करून घटनास्थळावरून 01 टिनाचा ड्रम, 01 जर्मनचे घमेले, 01 लाकडी टवरा, एक प्लास्टिक पाईप, 190 किलो सडवा मोहपास (किंमत 11,400/- रुपये) ड्रममधील सडवा मोहोपास 20 किलो (किंमत 1,200/- रुपये), 8 टिनाचे पिपे, 30 लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू (किंमत 6,000/- रुपये) असा एकूण 43,600 रुपयेचा माल जप्त करण्यात आला.

*सदर प्रकरणी पो. ठाणे गंगाझरी येथे
1) संतोष आसाराम पटले, वय 46 वर्षे, व 2) चंदना संतोष पटले, वय 42 वर्ष रा. मौजा बरबसपूरा, ता. तिरोडा, जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे अपराध. क्र. 432/2023 कलम 65(ब) (क) (ड) (इ) (फ), 83 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला
सदरची कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. श्री. महेश बनसोडे, पोहवा शामकुमार देशपांडे, राकेश भुरे, सचिन गेडाम, पोशि चंद्रपाल बरडे, मपोशि उमा जरवार, चापोशि जितेंद्रसिंह बघेल यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com