स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई खज येथे २ आरोपींकडून १ देशी बनावटीचा कट्टा १ जिवंत काडतुस असा एकूण ५०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदेशिर शस्त्र (गावठी पिस्टल कट्ट) बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांचावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दि.१८/११/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोन इसम मसूर फाटा उंब्रज येथे बेकायदेशिर गावठी कट्टयाची विक्री करण्याकरीता येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमांना ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने मसूर फाटा ब्रज ता. कराड जि.सातारा येथे जावून सापळा लावून बातमीमधील दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाच्या ताब्यात एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून ते दोघे सदरचा गावठी कट्टा विक्री करीता घेवून आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द उंब्रज पोलीस ठाणे गुरनं ६३५/२०२३ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३(१),२५ अन्वये नोंद केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यन्त एकूण ६४ देशी बनावटीची पिस्टल/कट्टे व १६८ काडतुसे व ३७७ रिकाम्या पंगळ्या अररा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश पाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अविनाश चव्हाण, अमित माने, खप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, पंकज बेसके सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट