स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई दोन चोरीचे गुन्हे उघड करुन तांब्याच्या विटा व ११ बॅटरी असा 6 लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे.

दिनांक २४/५/२०२३ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे व तांत्रिक विश्लेषनाद्वारे एम. आय. डी. सी. सातारा येथील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस येथे घडलेला तांबा तार चोरीचा गुन्हा महिला आरोपींनी मिळून केला आहे अशी बातमी मिळाल्याने अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सदरची माहिती पोउनि अमित पाटील व पथकास सांगून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोउनि अमित पाटील यांनी पथकातील महिला/पुरुष अंमलदार यांच्या मदतीने ६ महिला आरोपींना गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेवून त्यांच्याकडे कोशल्याने तपास करुन त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न केले. त्यांनी सदर चोरीतील तांब्याच्या तारा ज्या दुकानदारास विकल्या होत्या त्याच्याकडून ८८८ किलो वजनाच्या ५,७७,२००/- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा हस्तगत करून सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ४०७/२०२३ भादंवि कलम ३८०, ४९९, ३४ हा गुन्हा उघड केला. तसेच सदर महिला आरोपी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ३२९ / २०२३ भादंवि कलम ४६१ हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न करून त्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या ३०,०००/- रुपये किंमतीच्या एकूण ११ बॅटरी हस्तगत केला आहे. असे एकुण २ चोरीचे गुन्हे उघड करुन एकूण ६.०७.२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, मोना निकम, शकुंतला सणस, अनुराधा सणस, तृप्ती मोहिते, दिपाली नामदे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट