स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोक्यात दगड घालून खुन करणाऱ्या दोन आरोपींना आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले जेरबंद करून गंभीर खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा: दि.१०/०२/२०२३ रोजीचे पहाटे ०१.०० वा.ते सकाळी ०९.३० वा.चे. दरम्यान मौजे मेढा ता.जावली जि.सातारा गावचहे हद्दील मेढा ते महाबळेश्वर जाणारे रोडचे डावे बाजूस असलेल्या सुदर्शन फॅब्रीकेशन दुकानाचे समोरील खड्यात भरत राम बाबू पवार वय ३६ वर्षे रा.गांधीनगर मेडा ता. जावली जि.सातारा यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात सिमेंटच्या जबड धोबड दगडाने व लाकडी फळीने मारहाण करून खुन केला आहे म्हणून वगैरे दिले फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणे ३३/२०२३ भादविक ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर

पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना तात्काळ

गुन्हयाचे घटनास्थळी जावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तात्काळ पोलीस निरीक्षक

अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास

शिंगाडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावर आल्यानंतर

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक

अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार करून त्यांना सदरचा गुन्हा

उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

नमुद तपास पथके गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मेढा येथे राहणारे दोन इसमांनी यानी दि.१०/०२/२०१३ रोजी रात्री राम बाबू पवार या व्यक्तीचा खुन केला आहे, तद्नंतर तात्काळ त्यांनी तपास पथकांना सदरची माहिती सांगून दोन्ही संशईत इसमांना ताच्चात घेण्याच्या सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने नमुद आरोपींचा मेढा शहरात शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्यांनी मयत राम बाबू पचार हा दोन इसमांपैकी एकाचे वडीलांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्रास देत असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याचे सांगीतल्याने गंभीर खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघडकीस आणला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पचार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साचीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, मोहन पवार, प्रविण कांबळे, अजित कर्णे, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, सचिन ससाणे, शिवाजी गुरव, पंकज बेसके सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे. यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व जंगलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट