लोणंद पोलीस स्टेशनची कारवाईमोटारसायकल चोरीच्या दाखल गुन्हयातील २ आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग निष्पन्न करुन ३ दुचाकी केल्या हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- लोणंद पोलीस ठाणेचे हददीमधुन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत दि.९.७.२०२३ व दि.११.७.२०२३ रोजी २ गुन्हे लोणंद पोलीस ठाणेस दाखल झाले होते. दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने मा. पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांनी त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या. गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने लोणंद शहरातील, तसेच फलटण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी करून सीसीटिव्ही कॅमेरे तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन आरोपी असल्याचे निष्पण्ण झाले त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक असुन सदर आरोपी यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांनी चोरी केलेल्या मोटार सायकली गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी यांचेकडुन मोटरसायकल चोरीचे २ गुन्हे उघड केले आहेत.

गु.र.नं.

२९९/२०२३ ३०२ / २०२३

कलम

भादवि ३७९

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा, श्री. बापू बांगर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री विशाल वायकर, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, संतोष नाळे, पोलीस नाईक नितीन भोसले, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, सतिश दडस, अभिजीत घनवट, केतन लाळगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मेघा ननवरे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट