स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई घरफोडी चोरीचे ०२ गुन्हे उघड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:-

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. दिनांक २७/०७/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, एक काळे रंगाची पल्सर क्रमांक एमएच १९ / बीएम १८२८ वरुन एक काळे रंगाचे जकींग घातलेला एक इसम साईबाबा मंदीर गोडोली जवळ चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे.

त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकास नमुद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या तपास पथकाने साईबाबा मंदीर गोडोली येथे सापळा लावून काळे रंगाची पल्सर क्रमांक एमएच ११ / बीएम १८२८ वरील काळे रंगाचे जकींग घातलेला इसमास पकडुन त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात एक प्लॅस्टीकचे पिशवीमध्ये एक पिवळया धातुचे मणीमंगळसूत्र व एक पिवळया धातुची अंगठी तसेच रेडमी कंपनीचे दोन मोबाईल मिळून आले.

त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरच्या पिवळ्या धातुची अंगठी देशमुख कॉलनी सातारा येथील बंगल्यातुन व पिवळया धातुचे मणी मंगळसुत्र व एक मोबाईल पोतदार स्कुल लामजाईनगर परिसरातील बंगल्यातुन चोरी केली असल्याचे सांगितले सदरबाबत सातारा शहर पो.स्टे. गुरनं ४९७ / २०२३ भादविंसक ३८० प्रमाणे व शाहूपुरी पोलीस स्टेशन गुरनं ५७ / २०२३ भादविसक ३८०, प्रमाणे गुन्हे दाखल असून त्याचेकडुन एकूण ०२ गुन्हे उघड झाले आहेत. नमुद इसमास पुढील कारवाईकामी सातारा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलेश फडतरे, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, हसन तडवी, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, मनोज जाधव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, संकेत निकम यांनी सहभाग घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट