करमाड पोलिसांची कामगिरी २ दिवसांत १६०० कि.मी. प्रवास अन आरोपी व अल्पववयीन मुलीस नर्मदा नदीत पोहून घेतले ताब्यात …

उपसंपादक-रणजित मस्के
औरंगाबाद:– अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेलेल्या शिक्षकाला करमाड पोलिसांनी अखेर नेमवार ता. हंडिया, भोपाळ येथून अटक केली घेतले, पोलिसांना बघताच विषारी द्रव तोंडात घेऊन नर्मदा नदीत उडी मारलेला शिक्षक व विद्यार्थिनीला पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पोहत जात ताब्यात घेतले.
लाडसावंगी (ता. जि. औरंगाबाद) येथील खासगी संगणक प्रशिक्षण केंद्रात शिकवणीस येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने लाडसावंगी येथून पळवून नेल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. आरोपी शिक्षक महेंद्र त्रिंबक साठे (वय ४२, ह.मु. करमाड, ता. औरंगाबाद) असे मारली. शिक्षकाचे नाव आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होता तांत्रिक माहितीच्या आधारे एक पथक तयार करून ते ४ जुलैपासून आरोपीच्या मागावर होते. हे पथक त्यांचा पाठलाग करीत भोपाळ जिल्ह्यातील नेमवार गावच्या मंदिरासमोर पोहोचले. तेथे नदीच्या पायन्यांवर बसलेला शिक्षक व आणले. अल्पवयीन मुलगी करमाड पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांना पाहताच आरोपी महेंद्र साठे याने विषारी द्रव तोंडात घेऊन पाण्यात उडी मारली. पोलीस अंमलदार दादाराव पवार यांनी नदीत उडी घेतली. पोहता न येणारी मुलगी गटांगळ्या खात असल्यामुळे पोलीस अंमलदार पवार प्रसंगावधान राखत ताकदीने मिठी सोडून पाण्यात खोलवर जाऊन त्या मुलीला धकलत, धक्के मारून सुरक्षित ठिकाणी आणले.

स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलीचे प्राण वाचविणाऱ्या दादाराव पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दोन दिवसांत १६०० किमीचा प्रवास करून पोलिस पथकाने ही कारवाई पार पाडली. सदर कारवार्ड ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलीस अंमलदार दादाराव पवार, जयसिंग नागलोत, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र खंदारे यांनी पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com