पालघर पोलीस ठाणे यांचेकडून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :- पालघर जिल्हयामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असुन सदर गुन्हेगार हे नशा करुन गुन्हा करीत असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या नशा करणाऱ्या लोकांना आळा घालण्याकरीता अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांची माहीती मिळवून त्यांचयावर कठोर कारवाई करणे बाबत श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पालघर पोलीस ठाणे हद्यदीमध्ये पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांची माहीती मिळवण्यास सुरवात केली.

दिनांक १६/१०/२०२३ रोजी ०७.०० वाजेचे सुमारास गुप्त बातमीदार यांचे मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोनि / दत्तात्रय किद्रे यांनी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग श्रीमती निता पाडवी यांना सदर बातमी बाबत माहीती दिली व त्यांच्या आदेशान्वये दोन पोलीस पथक तयार करून प्रथम गांधीनगर मस्जिद गल्ली येथे छापा टाकला असता आरोपी नामे हाजी मस्तान रमजान शेख वय ३५ वर्षे रा. गांधीनगर पालघर पुर्व याचे राहते घरामध्ये बॉक्स लाकडी पलंगाच्या आत लपवलेला १६ किलो ३०० ग्रॅम वजनाचा, १,६०,०००/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणे करीता स्वताचे कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणून पथकामध्ये असलेले पो.हवा./चंद्रकांत सुरूम यांचे फिर्यादी वरुन पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५० / २०२३ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास पोउपनिरी/ संकेत पगडे हे करीत आहेत.

त्यानंतर गांधीनगर रेल्वे पटरीचे बाजुला छापा टाकला असता आरोपी नामे गणेश ऊर्फ टिकु गिरीधारी हरीजन वय ३५ वर्षे रा. गांधीनगर याचे राहते घरामध्ये असलेल्या लोखंडी कपाटामध्ये लपवलेला ११.९३ वजनाचा किंमत सुमारे १५०००/- रुपयांचा ब्राऊन शुगर (गर्दा) हा अंमली पदार्थ विक्री करणे करीता स्वताचे कब्जात बाळगतांना मिळुन आला. तसेच सदर आंली पदार्थाच्या विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम ६६९०/- रुपये मिळून आल्याने त्याबाबत पथकातील पो.हुवा. / भगवान आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५१/२०२३ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास मसेपानि /मंजुषा शिरसाठ नेम, पालघर पोलीस ठाणे हया करीत आहेत.

वरील कामगिरी मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर जिल्हा यांचे मार्गदर्शना खाली मा. श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, विभाग पालघर, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय किद्रे, पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे, विवेक नार्वेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक, मसपोनि मंजुषा शिरसाठ, पोउपनिरी/ संकेत पगडे, श्रेणी पोउपनिरी/ दौलत आतकारी, सफी सुभाष खंडागळे, पो.हवा./आव्हाड, पोहवा / सुरूम, पो.ना./१०२३ मुसळे, पो.कॉ./राऊत, पोकों/कांबळे, पो.कॉ./आराक, पो.कॉ./देसले, पो.कॉ./डोके, पो.कॉ./खर्चाणे, मपोशि/ धोडी, मपोशि/ वर्षे, मपोशि/ तिडके, मपोशि/लोखंडे, चालक पोकों/ गांगुर्डे, पोकॉ/ केंद्रे पालघर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट