हत्ती या प्राण्याचे दात (हस्तीदंत) बाळगणाऱ्या २ आरोपीवर कारवाई..

उपसंपादक-रणजित मस्के
मानपाडा ;दिनांक ०५/०१/२०२५ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याचे हददीत एमआयडीसी परिसर येथे दोन इसम हत्ती या प्राण्याचे दात (हस्तीदंत) तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी १) आकाश प्रकाश पवार, वय. २८ वर्ष, व २) नितीन विलास धामणे, वय. २६ वर्ष, दोघे रा. इंदु अपार्टमेंट, रूम नं. ५०३, पाचवा माळा, भाजी मार्केट जवळ, तुकाराम चौक, दावडी, डोंबिवली पुर्व यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडुन दोन हत्ती या प्राण्याचे दात (हस्तीदंत), एक मोटार स्कूटर, दोन मोबाईल असा एकुण १०,६०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींनी हत्ती या प्राण्याचे २ दात (हस्तीदंत) तस्करी करून विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याने त्यांचेविरूध्द मानपाडा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १९/२०२५ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग श्री. सुहास हेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) श्री. जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेश राळेभात, श्री. संपत फडोळ, पोलीस हवालदार/ राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनिल पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, पोलीस नाईक / गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लापा पाटील, पोलीस शिपाई / घनश्याम ठाकुर, अशोक आहेर, गणेश बडे व सोपान शेळके यांचे पथकाने केलेली आहे.