जिल्ह्यातील 31 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी दुरदुष्य प्रणाली द्वारे उद्घाटन…

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-पालघर दि. 19.कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र”ची स्थापना करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील 31 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता दुरदुष्य प्रणाली द्वारे उद्घाटन होणार आहे.
या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील “Dnyandeep Mandal’s St. Joseph College of Arts & Commerce, Satpala, “Annasaheb Vartak College of Arts, Kedarnath Malhotra College of Commerce & E.S. Andreades College of Science,” St Gonsalo Garcia College of Arts and Commerce “Shurparaka Educational & Medical Trust’s M.B. Harries College of Arts & A.E. Kalsekar College of Commerce & Management,” Krushi Tantra Niketan, Virewadi, Vangaon, ” Vidya Vihar English School & Jr. College,Prajapti College of Nursing, Kudus, ” Kiran Patil Junior College Of Arts, Science & Commerce (Bi-Focal), ” Bassein Urdu Education Society, Huzaifia Junior College of Science & commerce, ” Shree Siddhivinayak English School & Jr. College, Jaydeep Vidya Mandir High School & Jr. College, ” R.N. Education Society’s Recon Women’s Degree College of Commerce, ” Kokan Education & Medical Trust’s Private ITI, Saphale, ” Kelva Mahim Private ITI, ” Wada College of Management & Science,Mount Mary English High School & Junior College of Science Commerce & Arts, ” National Junior College of Science and Commerce “Shri Binoy Gardi Swajan Vidyalaya and Junior College, Alonde” Arvind Ashram School and Junior College, Dadade, ” Kalyani Patil degree College of art science and commerce Nalasopara Palghar, “G.S.P College of Arts, Science & Commerce Talasari,”Sanjivani Technical Education Junior College, Talasari,”Shree Mahalasa Narayani School & Jr. College, “SHRI CHHATRAPATI SHIVAJI SHIKSHAN PRASARAK MANDAL, “St. Anne’s Convent High School and Junior College, “Kaustubh Vidyalay And Jr. College,”IDYAVARDHINI’S BHAUSAHEB VARTAK POLYTECHNIC
Moreshwar Cidyalay & Jr. College. या 31 महाविद्यलयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच 20 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास पालघर जिल्हयातील सर्व विद्यार्थी तसेच त्या – त्या तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने नजीकच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे. कार्यक्रम स्थळाच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर यांचेशी 02525-299812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com