महाड तालुक्यातील हॉटेल सुमय्या गार्डन येथील आचारीवर धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात आचारी गंभीर जखमी..

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :– महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा तरुणांवर
हाफ मर्डरचा गुन्हा दाखल..!
रविवारी दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास भावे गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सुमया गार्डन येथील एका जेवण बनवणाऱ्या कुकवर धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत.
यामध्ये हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे राहणार तळीये हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील दोन तरुण आरोपींनी जखमी फिर्यादी यांच्या मांडीवर,डोक्यावर, व छातीवर धारदार हत्याराने वार केले. तसेच हॉटेलमधील सहकारी कर्मचारी भांडण सोडवायला गेले असता आम्ही मुंबईचे भाई आहोत आमच्या नादाला लागला तर आम्ही तुमचे हॉटेल पेटवून टाकू व तुम्हाला खोट्या ॲट्रॉसिटी केस मध्ये अडकवून टाकू तसेच यापुढे कुठे भेटलात तर सोडणार नाही अशी धमकी देऊन पुन्हा फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दगड भिरकावून मारण्यात आली.
याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भादविस कलम ३०७, ३३६, ५०६, ५०४, ३४ यासह अन्य कलमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम उर्फ राज अनंत तांबे वय 22 वर्ष, व अमृत अनंत तांबे वय 23 वर्ष दोघेही राहणार भावे बौद्धवाडी अशी आरोपींची नावे असून या दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
घडलेली घटना गंभीर असून विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com