पोक्सो गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीतास नालासोपारा येथून एमएचबी काॅलनी पोलीसांनी घेतले ताब्यात…

उपसंपादक- विजय परमार
मुंबई ; बोरीवली :- ➡️ गुन्हा नोंद क्र :- 520/2024 कलम 74 भा. न्या. सं 2023 (BNS) सह कलम 8,12 पोक्सो अधिनियम
➡️ गुन्हा घडला दिनांक व वेळ – दि. 31/08/2024 रोजी 07.20 ते 07.40 वाजताच्या सुमारास
➡️ गुन्हा दाखल तारीख, वेळ –
दि. 31/08/2024 रोजी 13.26 वा
➡️ घटनास्थळ – मेरी इम्याकुलेट स्कूल ते गणपत पाटील नगर, बोरिवली प, मुंबई
➡️ अटक आरोपी: नरेश मोती सिंग, वय 43 वर्षे, धंदा- रिक्षाचालक, राठी- यश यादव चाळ, गोराई डेपो च्या मागे, गोराई 03, बोरिवली प, मुंबई.
आरोपी अटक दिनांक 04/09/24 रोजी 22:02 वाजता
➡️ हकीकत :- यातील फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाणे येवुन सांगितले कि, दिनांक 31/08/2024 रोजी 07:20 वा ते 07.40 वा दरम्यान मेरी इम्याकुलेट स्कूल ते गणपत पाटील नगर, बोरिवली प, मुंबई असा रिक्षाने प्रवास करत असताना अनोळखी रिक्षा चालकाने त्याची रिक्षा बंद पडल्याचा बहाणा करून, रिक्षा उभी करून प्रथम वाय एम सि गार्डन जवळ, बोरिवली प, मुंबई व त्यानंतर गल्ली न 02, गणपत पाटील नगर, बोरिवली प, मुंबई येथे फिर्यादी वय 15 वर्षे हिच्या संमती शिवाय तिच्या पायावर, मांडीवर तसेच छातीला स्पर्श केला म्हणून तक्रार नोंद.
➡️ तपास – सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने मा.वपोनि सो सुधीर कुडाळकर, पोनि (गुन्हे) सचिन शिंदे, पोनि रविराज जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि संदीप गोरडे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळ परिसरातील व मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी रिक्षा चालकाचा रिक्षा क्रमांक प्राप्त केला. रिक्षा क्रमांक वरून रिक्षा चालकाच्या राहते घर परिसरात जाऊन माहिती प्राप्त केली असता तो गुन्हा केल्यानंतर एक गॅरेजवर रिक्षा पार्क करून पळून गेला आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर सलग चार दिवस सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, तसेच पो उ नि निलेश पाटील व पथक यांनी मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती प्राप्त झाली की, आरोपीत हा नालासोपारा पूर्व या भागात मोबाईल बंद करून लपून राहत आहे. सदरवेळी माहिती प्राप्त झाली की, आरोपित हा काही वर्षांपूर्वी त्याच भागात रिक्षा चालवण्याचे काम करायचा. त्यानंतर खास बतमीदारामार्फत पाहिजे आरोपीचे लपण्याचे ठिकाण शोधून काढले व सापळा लावून नमूद गुन्हयातील आरोपीतास पो उ नि गोरडे व पथकाने नालासोपारा पूर्व येथून ताब्यात घेतले व नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.
➡️ मार्गदर्शक:- मा. पोलीस उप आयुक्त. परी-11 – श्री. आनंद भोईटे.
सहाय्यक पोलीस आयुक्त- श्री.सुनिल जायभाये, बोरीवली विभाग.
व. पो. नि. श्री सुधीर कुडाळकर.
पो. नि. (गून्हे) श्री. सचिन शिंदे.
पो. नि. श्री रविराज जाधव
➡️ तपास पथक :-
पोउनि संदीप गोरडे
पोह 990320/प्रवीण जोपळे
पोह 050564/संदीप परीट
पोह 060799/सतीश देवकर
पोशि 080461/अर्जुन आहेर
पोशि 130229/गणेश शेरमाळे
➡️ तांत्रिक मदत-
पोउनि निलेश पाटील व पथक
पोशि 100014/आदित्य राणे यानी केली अशी माहिती श्री सुधीर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एमएचबी कॅालनी पोलीस ठाणे यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com