घाटकोपर पोलीस ठाणेकडून ६० तोळे सोने चोरी करणाऱ्या आरोपीतास बिहार राज्यातून जेरबंद केले.

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई ( घाटकोपर ) : घाटकोपर पो. ठाणे अंतर्गत माहे सप्टेंबर महिन्यात फिर्यादी नामे राजेश प्रेमजी वरीया, वय ४० वर्षे हे छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रिक्षा पकडून घाटकोपर रेल्वे स्थानक येथे उतरत असताना सदर गुन्हयातील रिक्षा चालकाने फिर्यादींचे ३०,६०,८००/- रूपये किमतीचे ६० तोळे सोने फिर्यादींच्या संमतीशिवाय, लबाडीने चोरी केले होते. सदर बाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन घाटकोपर पो. ठाणे येथे गु.र.क्र. ९६२ / २०२२ कलम ३७९ भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान घाटकोपर पोलीस ठाणेचे पो.उप. नि. खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्हा घडलेल्या गुन्हयाचे विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीताची ओळख पटवली त्यानुसार आरोपी नामे नंदकिशोर बिसुन यादव, वय २२ वर्षे व त्याचा साथीदार नामे सरवणकुमार नकुल साह, वय ३१ वर्षे, राठि:- मु. लायस, पोस्ट लोहा, जिल्हा जमुई है आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पुढे आणखी तपास करता दोघेही आरोपी हे बिहार येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार तपास पथक तयार करून बिहार राज्यामध्ये (नक्षलग्रस्त भागात) सोनो स्थानीक पोलीस ठाणे यांच्या मदतीने त्याचा शोध घेवून सापळा रचून नमुद आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीतांनी गुन्हयातील चोरी केलेल्या ३०० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडयापैकी एक सोन्याची बांगडी तेथील ज्वेलर्स नामे विवेक कुमार आणि ज्योती वर्मा यांना विकली असल्याचे निष्पन्न झाले.
सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास करून एकूण २४,३५,८००/- रु. ची (त्यात ३०० ग्रॅम सोने व सोने विक्री करुन आलेली ९ लाख रुपये रोख ) मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगिरी ही श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, श्री. सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त (का. व सु.), श्री. विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या आदेशाने व श्री. पुरुषोत्तम कराड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ७, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. आनंद नेर्लेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, घाटकोपर विभाग, मुंबई यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय डहाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर खरमाटे, पो.ना.क्र. ०१४५५/ कोयंडे, पो.ना.क्र. ०४०७०४ /देवार्डे, पो.ना.क्र. ०५०७६९/कंक, पो. शि. क्र. ०८०२०० / नागरे, पो.शि.क्र. १११४९९/ भोकरे, पो.शि.क्र. ११३११८ / गव्हाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com