गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या आरोपीतांना अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर दिनांक २५/१०/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे मा. वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंगलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, कात्रज तलाव येथे दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करता आले आहेत. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव येथे जावुन पाहीले असता त्यांना इसम नामे १. अर्जुन महादेव शेलार, वय १८ वर्षे, ६ महीने, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि.पुणे २. प्रेम राजु शेलार, वय २० वर्षे, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे हे त्यांचे ताव्यातील बॅगेमध्ये १५ मोबाईल फोनसह मिळुन आले. त्यामोबाईल फोनबाबत आरोपीतांकडे तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे कात्रज, गोकुळनर, कोंढवा भागातुन चोरी केले असुन ते विक्री करता आलो असल्याचे सांगितले आहे. वर नमुद आरोपीतांचे ताब्यातील मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यामधील विवो कंपनीचा मोबाईल फोन हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६९७ / २०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपीतांना नमुढ गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडुन एकुण ०२,०२,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. आरोपीतांचे ताब्यात मिळुन आलेल्या उर्वरीत १४ मोबाईल फोनबाबत तपास चालु आहे. आरोपीतांकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्यासाठी चोरी केले असल्याचे सांगितले आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे,यांच्या पथकाने केली आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com