खून करून पळालेल्या आरोपीस २४ तासात हैदराबाद मधुन एम एच बी काॅलनी पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी- विजय परमार

बोरीवली :-➡️ पोलीस ठाणे- एम एच बी कॉलनी, पो ठाणे, मुंबई

➡️ गु. र.क्रमांक – 445/2024 कलम 103(1),118(2),352,115 भा.न्या.स.

➡️ फिर्यादी:- श्री अवधेश कुमार फुलुराम यादव , गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड बोरवली पश्चिम

➡️ थोडक्यात हकीकत :-
फिर्यादी नामे अवधेश कुमार यादव, यांनी असे कळवले की आरोपी नामे राजीव साह, वय अंदाजे 23 वर्षे याने त्यांची बहीण नामे चुनियादेवी राम विश्वास यादव, वय 32 वर्ष, धंदा-घरकाम,रा..ठी. गल्ली नंबर 04, गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड बोरवली पश्चिम मुंबई. हिच्याशी कोणत्यातरी कारणावरून वाद घालून शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून, कोणत्यातरी हत्याराने डोक्यात जखम करून जवळच शिजत असलेल्या पातेल्यातील गरम भात हातावर पडून दोन्ही हाताच्या मनगटावर भाजण्यास कारणीभूत ठरून गंभीर दुखापत केली म्हणून राजीव साह अंदाजे वय 23 वर्ष याच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली.
सदर जखमी महिला या के.इ.एम हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना, दिनांक 02/08/2024 रोजी सदर महिलेस मयत घोषित केले.

➡️ तपास
मा वपोनि श्री सुधीर कुडाळकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासासंबंधी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्या अनुषंगाने गुन्हे प्रगटीकरण अधिकारी पो उप नि संदीप गोरडे व पथक यांनी पाहिजे आरोपीताविषयी परिसरात माहिती प्राप्त करून त्याचा मोबाईल नंबर व फोटो प्राप्त केला व, तांत्रिक तपास करून मोस्ट कॉलर चे मो क्र प्राप्त केले. त्यापैकी एक मुंबईतील व एक हैदराबाद येथील मोस्ट कॉलर चा मो क्र मिळाला. मुंबई येथील मोस्ट कॉलर चा शोध घेऊन त्याच्याकडून पाहिजे आरोपीताविषयी अधिक माहिती प्राप्त केली. त्यानंतर माहिती मिळाली की आरोपी हा गुन्हा केल्यानंतर हैदराबाद येथे पळून गेला आहे.

त्यानंतर मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप गोरडे व पथक यांनी टीम तयार करून खाजगी वाहनाने हैदराबाद येथे रवाना झाले. सलग 15 तास प्रवास करून कोमपल्ली, हैदराबाद येथील मोठ्या इंडस्ट्रियल एरिया मध्ये, आरोपिताचा शोध घेऊन व सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तात्काळ परतीचा प्रवास चालू केला. अशा प्रकारे पथकाने सलग 32 तास प्रवास करून आरोपितास पोलीस ठाणेस आणून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.

➡️ अटक आरोपीचे नाव व पत्ता
राजीव कुमार गणोर साह, वय 23 वर्षे, गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड बोरवली पश्चिम मुंबई.

➡️ अटक दिनांक व वेळ
04/08/2024, वेळ – 17.04 वा.

➡️ तपास मार्गदर्शक-
श्री आनंद भोईटे, मा. पोलीस उप आयुक्त, परि 11, मुंबई सो.
श्री सुनिल जायभाये, मा. स.पो.आ, बोरिवली विभाग, मुंबई
श्री सुधीर कुडाळकर, मा. व पो नि

➡️ तपास पथक
पोलीस उपनिरीक्षक संदिप गोरडे आणी पथक यांनी केला अशी माहिती श्री सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट