जबरी चोरी करणारे आरोपी स्था. गुन्हे शाखा सांगली यानी केले जेरबंद करून ०४ गुन्हे उघड, ५,१५,०९६/- रु. चा मुद्देमाल हस्तगत

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली

पोलीस स्टेशनकडेगावविटागु.घ.ता वेळदि. १३.१२.२४ रोजी १३.१५ वा.दि. २५.०३.२४ रोजी १६.०० वाअपराध क्र आणि कलम२७१/२०२४ बी.एन.एस. कलम ३० (४), (६), ३(५)१३०/२०२४ भा.दं.सं. कलम ३९२, ३४गु.दा.ता वेळदि. १३.१२.२४ रोजी १५.३८ वा दि. २५.०३.२४ रोजी २०.२० वा.फिर्यादी नावउर्मिला भगवान कांबळे, रा कडेपूर, ता- कडेगावराजाक्का अंकुश जाधव, रा देवनगर वासुंबे, ता खानापूरकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली,मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,यांचे मार्गर्शनाखालीमाहिती कशी प्राप्त झालीपोहेकों हणमंत लोहार पौशि प्रमोद साखरपेपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगलीसहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगलीपोहवा / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहारपोशि/ प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सुरज थोरात, सोमनाथ पतंगे, सुशांत चिले, गणेश शिंदे पोशि / कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे, सायबर पोलीस ठाणेअटक वेळ दिनांक दि.०३/०१/२०२५ रोजीआरोपीचे नांव पत्ता१. अभिषेक जगन्नाथ जाधव, वय २३ वर्षे, रा देवराष्ट्रे, ता कडेगाव, जि सांगली२. निरंजन बळवंत कुरळे, वय २२ वर्षे, रा देवराष्ट्रे, ता कडेगाव, जि सांगली३. सौरभ महादेव इंगवले, वय २२ वर्षे, रा देवराष्ट्रे, ता कडेगाव, जि सांगली४ सुलताना बालेखान मुलाणी, वय ४३ वर्षे, रा कडेपूर, ताकडेगाव, जि सांगली. (महिला)उघडकीस आलेले गुन्हे१. कडेगाव पोलीस ठाणे सी.सी.टी.एन.एस. नं. २७१/२०२४ बी.एन.एस कलम ३०९ (४), (६), ३(५)२. विटा पोलीस ठाणे सी.सी.टी.एन.एस. नं. १३०/२०२४ भा.दं.सं. कलम ३९२, ३४३. विटा पोलीस ठाणे सी.सी.टी.एन.एस. नं. १४७/२०२४ भा.दं.सं. कलम ३९२, ३४४. इस्लामपूर पोलीस ठाणे सी.सी.टी.एन.एस. नं. २७१/२०२४ बी.एन.एस कलम ३०४, ३(५)जप्त मुद्देमाल१) ४.३५.०९६/- रु. सोन्याचे मनी मंगळसुत्र, टॉप्स, दोन वाटया असे दागिने२) ७०,०००/-रू. एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल जु. वा. कि. अं.३) १०,०००/-रू. एक रेडमी कपंनीचा मोबाईल जु. वा. कि. अं.एकूण ५.१५,०९६/-रू.गुन्हयाची थोडक्यात हकीकत-गुन्हयाची थोडक्यात हकीकत-मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून महिलांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे गळ्यातील दागिने चोरी करणा-या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.त्या अनुशंगाने दि. ०३/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोहेकों / हणमंत लोहार व पोशि / प्रमोद साखरपे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विटा ते कडेपूर जाणारे रोडवर एका काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकलवरून तीन संशयीत इसम जबरी चोरीतील सोने विक्री करीता येणार आहेत,नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, विटा ते कडेपूर जाणारे रोडला निगराणी करीत थांबले असता एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून तीन इसम येत असल्याचे दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदरची गाडी थांबवून इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १. अभिषेक जगन्नाथ जाधव, वय २३ वर्षे, रा देवराष्ट्रे, ता कडेगाव, जि सांगली २. निरंजन बळवंत कुरळे, वय २२ वर्षे, रा देवराष्ट्रे. ता कडेगाव, जि सांगली ३. सौरभ महादेव इंगवले, वय २२ वर्षे, रा देवराष्ट्रे, ता कडेगाव, जि सांगली अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, अभिषेक जाधव याचे पॅन्टचे उजव्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. त्याचेकडे असले सोन्याचे दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने व निरंजन कुरणे या दोघांनी मिळून सुलताना बालेखान मुलाणी, रा कडेपूर, ता कडेगाव हिचे सांगणेवरुन लवंग मळा, कडेपूर येथील शेतामध्ये काम करणा-या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्र. ०१ व ०३ यांनी इस्लामपूर येथील पेठ, विटा येथील कार्वे व देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली असल्याचे सांगितलेसदर बाबत इस्लामपूर, कडेगाव, विटा पोलीस ठाणेंचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे जबरी चोरी व चेन स्नॅचिग गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व मोबाईल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कडेगाव व इस्लामपुर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कडेगाव व विटा पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट