अपघात करुन पळुन जाणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे ;

आज दि.17/12/2025 रोजी नारायणगाव हद्दीमधे होटेल मुक्ताईt ढाब्या नजिक झालेल्या तिहेरी अपघातमध्ये प्रवासी वाहतुक करणाऱ्या मेक्सीमो गाडीला आयशर ट्रकची जोरदार धडक बसून प्रवासी वाहतूक करणारी मेक्सिमो गाडी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस टी बस वर आदळून नऊ प्रवसांचा जागीच मृत्यू झाला होता तसेच सदर आयशर ट्रक चालक घटनास्थवरून फरार झाला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी सदर ट्रक ड्रायव्हर याचा शोध घेवून त्याला त्वरित अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर नुसार गुन्हे शाखेच्या स.फौ दीपक साबळे व अक्षय नवले यांनी परिसरातील CCTV तसेच चाळकवाडी टोलनाका येथून सदर आयशर ट्रक चालकाचे फोटो प्राप्त करुन त्याचा शोध सुरू केला. सदर ट्रक ड्रायवर हा घटनास्थळावर ट्रक सोडून चाकण बाजूला निघून गेल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण तसेच माळूंगे MIDC हद्दीत शोध सुरू केला. माळूंगे MIDC मध्ये त्याचा शोध घेतला असता सदर इसम हा हरियाणा येथे निघून जाण्याचा तयारीत असताना त्याला गुन्हे शाखेने सापळा लाऊन ताब्यात घेतले. सदर इसमाला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव रोहित कुमार जगमालसिंग चौधरी वय 30 वर्ष रा. मोहमदपुर जाट, ता- बावल, जि. रेवाडी, हरियाणा असे सांगितले.
आरोपीची वैदकीय तपासणी करुन त्याला पुढील कार्यवाही साठी नारायणगाव पोस्टे च्या ताब्यात दिले आहे
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अविनाश शिळीमकर
स.फौ.दीपक साबळे
पोहवा. राजु मोमीन
पोहवा. विक्रम तापकीर
पोहवा. संदीप वारे
पोशी. अक्षय नवले
पोशी. निलेश सुपेकर
यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट