आरोपी गजानन मारणे याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
दिनांक 25/02/2025 रोजी
कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 46/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118(1),3(5),109,118(२),126(2), सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम3(1)(ii),3(4) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी गजानन पंढरीनाथ मारणे वय 58 रा. कोथरूड पुणे यास दिनांक 24/02/2025 रोजी अटक करण्यात आली .
त्यास आज दि. 25/02/2025 रोजी मा. न्यायालयाने दि.03/03/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर श्री. गणेश इंगळे हे करीत आहेत.