८ किलो गांजासह आरोपी अरविंद चौरसीया नवघर दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात..

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:– पालघर गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई नवघर पोलीस ठाण्याचे दहशतवादीविरोधी पथकाने केली.
या कारवाईत १ लाख ६० हजार रुपयांचा ८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
नवघर पोलीस ठाण्याचे दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम हा नवघर रोड येथे गांजा हा अमली पदार्थ विक्री करिता येणार आहे.
या माहितीच्या आधारे नवघर पोलीस ठाणे दहशतवादीविरोधी पथकातील पोउपनि तुषार माळोदे, हवालदार जावळे, अंमलदार तडवी यांनी त्या ठिकाणी सापळा लावला. पोलीस आल्याचे पाहून अरविंद दिपक चौरसीया (वय २७ वर्षे, रा. विरार पूर्व) याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात १ लाख ६० हजार रुपयांचा ८ किलो गांजा आढळून आला.
अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात ( गु.र.नं. १३५/२०२४) एन.डी.पी.एस. ८ (क) २० (च) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि तुषार माळोदे हे करत आहेत.

ही कारवाई मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी, पोलीस निरीक्षक केदारे, पोलीस निरीक्षक गोमते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक माळोदे, हवालदार जावळे, अंमलदार तडवी यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com