दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक, आमगाव पोलीसांची कामगिरी..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, घटना तारीख 16/07/2021 चे 14/07 वा. दरम्यान फिर्यादी- श्री. रवि नारायण काळबांधे रा. कालीमंदीर जवळ ता. आमगाव जि. गोंदिया यांचे घराचे समोरील दाराचा कुंदा, ताला, व समोरील दार तोडून घराचे आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीचे रीपोर्ट वरून पोलीस ठाणे आमगाव गु. र. क्र. 226/2021 कलम 457, 380, 511 भा.दं.वि. अन्वये चां गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात घटनास्थळ पंचनामा कार्यवाही प्रत्यक्ष दर्शी साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. गुन्हाचे एकंदरीत तपासा दरम्यान फिर्यादीचे घराचा रात्री दरम्यान समोरील दाराचे कुंदा व ताला तोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञात आरोपीने गुन्हा करतेवेळी पळून जाताना फिर्यादी व त्याचे मुलाने पाहीले होते. तसेच आरोपीने आपले जुते व चप्पल घटनास्थळी सोडून पळून गेला होता. तपासात जुता व चप्पलची ओळख पटली असून सदर जूता व चप्पल ही घराशेजारील राहणारा आरोपी नामे - आकाश सुनिल भांडारकर व त्याचे साथीदार मित्राचे असल्याचे निष्पन्न झाले. साक्षपुरावे मिळुन आले. परंतू नमुद आरोपी आकाश भांडारकर हा गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने तसेच तो मिळून न आल्याने त्याचेविरुध्द सिआरपीसी कलम 299 अन्वये मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
दिनांक- 01/09/ 2023 रोजी प्राप्त गुप्त बातमीदारचे गोपनिय माहीतीवरून नमुद गुन्हातील आरोपी हा मा. प्रथमश्रेणी कोर्ट आमगाव, येथे दुसऱ्या गुन्ह्यात सुनावणीवेळी येणार असल्याचे माहीती प्राप्त झाली त्यावरून मा. वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली आरोपीस मा. न्यायालय, आमगाव यांचे न्यायालया चे बाहेरील परिसरात येताच त्यास सापळा रचून पकडण्यात येवून ताब्यात घेण्यात आले. तसेच नमुद गुन्हयात विचारपुस कामी पो.स्टे. आमगाव येथे आणले व विश्वासात घेवून त्यास गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता नमुद घटना केल्याची कबुली दिली. नमूद गुन्हा घडल्यापासून आरोपी हा फरार व गुन्हयात पाहीजे आरोपी होता. आमगाव पोलीसांनी शिताफीने आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक गोंदिया. मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, श्री. चंद्रकांत काळे, प्रभारी अधिकारी उपविभागिय पोलीस अधिकारी आमगाव, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री युवराज हांडे, पो. स्टे. आमगाव, पोहवा गजपुरे, कुरसंगे, चौधरी, पोशि शेंडे , चव्हाण, उपराडे, शेंडे यांनी कामगीरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com