मोक्का व पोक्सो गुन्हयातील फरारी आरोपीस कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेनी केली अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा तालुका पोलीस ठाणे गु. र. नं. 75/2023 भादंविसं. क. 395, 363, 420, 354, 120 (ब), 364
(अ), 365, 452, 109, 323, 504, 506 सह सावकारी अधिनियम क. 39, 45 चिटफंड अॅक्ट क. 76 व मोक्का फायदा 3 (1) (II), 3 (2), 3 (4) व 4 मधील दिनांक 20.02.2023 पासुन फरारी आरोपीने फरार कालावधीमध्ये दिनांक 19.07.2023 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस अमिष दाखवुन तिचेवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन गंभीर अपराध करुन पोलीसांचे नजरेआड रहात बेमालूमपणे फरार असणा-यास शोध घेवुन त्या आरोपीस अटक करण्याचे आदेश मा. श्री. समीर शेख सो, मा. पोलीस अधीक्षक, सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो, कराड शहर पोलीस स्टेशन प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप सुर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिले होते.

त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व पोलीस अंमलदार यांनी सदरहु गुन्हयातील फरारी आरोपीत अक्षय अनिल तळेकर रा. हरपळवाडी ता. कराड़ याची गोपनीय बातमीदार तयार करुन माहीती काढणेचे प्रयत्न सुरु केले होते. दिनांक 22.12.2023 रोजी गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातरजमा करता नमुद आरोपोत हा बैलगाडया शर्यतीतील ड्रायव्हर असुन तो कालरोजी बैलगाडा शर्यतीकरोता येणार असलेची खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, प्रविण जाधव व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने बैलगाडा शर्यतीस येणारे शेतक-यां सारखा पेहराव करुन वेषांतर करुन पाचवड फाटा, कराड येथे सापळा रचुन थांबले असताना त्यांस पोलीसांची चाहुल लागलेने तो पळुन जायचे तयारीत असतानाच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी त्यांस पाठलाग करुन शिताफीने अटक केली.अक्षय अनिल तळेकर, वय- 29 वर्षे, रा. हरपळवाडी ता. कराड हा नमुद गुन्हे केलेपासुन फरार झाला होता.

सदर फरारी आरोपीस पकडणेची कामगिरी कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांसह केली आहे. फरारी आरोपीची गोपनीय बातमी दारांकडुन माहीती मिळवुन तपासचक्र फिरवत कसोशीने माहीतीच्या आधारे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीत अक्षय अनिल तळेकर, क्य- 29 वर्षे, रा. हरपळवाडी ता. कराड यांस पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असून त्यांस अटक करणेस कराड शहर डो. बी. पथकाने यश मिळविलेले आहे. पुढील कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. अमोल ठाकुर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व मा. श्री. प्रदीप सुर्यवंशी सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आर. एल. डांगे व पोलीस अंमलदार स. फौ. रघुबीर देसाई, स. फो. संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर पो. अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी कराड शहर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट