नामांकित व्यवसायीकाचा खुन करण्याचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने ठोकल्या बेड्या ..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो. सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. आर.एल. डांगे पोलीस उप निरीक्षक श्री.पी.एस. जाधव व कराड शहर डीबी पथकाने कराड उप नगरातील नामांकित व्यवसायीकाचा खुन करण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीस केले अटक सदरचा आरोपी हा गेल्या
चार महिन्यापासुन होता फरार
कराड शहरालगत असले सॅफरॉन हॉटेल जवळ जुना जमिनीचा बाद उफाळुन एका नामांकीत व्यवसायीकास जिवेमारणाच्या प्रयत्न करुन आरोपीत हे फरार झाले होते.

सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणेस दोन्ही गटाने परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. जमिनीचा वाद हा वर्षानुवर्ष जुना असल्या कारणाने त्यातुन पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिस्थीतीचे गांभीर्य ओळखुन सदर पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांनी नमुद घटनेतील ०३ आरोपी तात्काळ अटक केले होते. परंतु मुख्य आरोपी हा गुन्हा घडले पासुन फरार होता. नमुद आरोपीचा वावर हा कराड शहर परिसराचे आजुबाजुस छुप्या स्वरुपात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे यांनी प्राप्त करुन सदर फरार आरोपी नामे कमरअली वाहीद मुतवली वय 28 वर्षे रा. 190 गुरुवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा यास पाठलाग करुन अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो., मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक राज डांगे सो, प्रविण जाधव, सफौ संजय देवकुळे, पो.हवा शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com