शिवसेना शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार के.ई.एम.हाॅसपिटल परेल येथे रुग्णांच्या होत असलेल्या विविध गैरसोय बाबत विशेष भेट…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मुंबई: बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसह के.ई.एम. हॉस्पिटल परेल येथे हॉस्पिटल च्या अधिष्ठाता (डीन) डॉ.संगीता रावत मॅडम आणि सिनियर ए.एम.ओ.डॉ.प्रवीण जी बांगर यांची भेट घेऊन रुग्णालयात रुग्णांना येणाऱ्या विविध अडीअडचणी उदा. हॉस्पिटल मधील असलेल्या एम.आर.आय व सिटी स्कॅन मशीन बद्धल रुग्णांना येणाऱ्या अडचणी लवकर न मिळणाऱ्या तारखा, ब्लड बँक मध्ये येणाऱ्या अडचणी,सोनो ग्राफी मशीन एकच उपलब्ध असल्या बद्धल हॉस्पिटल मध्ये शिकाऊ डॉक्टर व कर्मचारी यांच्या कडून रुग्णांना मिळणारी वागणूक व इतर विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले तेव्हा या अडचणींवर तोडगा काढून लवकरच दूर करू असे आश्वासन डीन मॅडम कडून देण्यात आले तसेच त्यावेळी संघटने च्या वतीने वेळोवेळी रुग्णांना मदत करणाऱ्या डीन डॉ.रावत मॅडम व डॉ.प्रवीण बांगर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शिव आरोग्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी संघटनेचे *पॅरामेडिकल विभागाच्या महा.अध्यक्षा डॉ.गौरी कोठारे, मा.नगरसेविका सौ.ज्योतिताई भोसले,डॉक्टर सेलच्या ईशान्य मुंबई अध्यक्षा डॉ.शारिवा रणदिवे,श्री.अमोल वंजारे,सौ.सुप्रिया ठोंबरे-पाटणे,श्री.शिवाजी झोरे श्री.विनायक कानसकर, श्री.मयूर वाटाबळे, श्री.सिद्धेश मोहिरे,रुग्णसेवक श्री.प्रदीप मोगरे,श्री.राजाभाऊ झगडे,श्री.लीतेश केरकर, श्री.साक्षत म्हात्रे,श्री.किशोर भिलारे,श्री.मोहम्मद शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट