एम.पी.डी.ए. मधील फरार आरोपी शुभम धुमाल यास लोणी काळभोर पोलीसांनी केले जेरबंद..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
लोणी काळभोर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शुभम संजय धुमाळ वय २३ वर्षे रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, पुणे याचे विरुध्द लोणी काळभोर व परिसरातील विवीध पोलीस ठाणेस खंडणी, जबरी चोरी, दुखापत यासासरखे गंभिर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वाढते गुन्हेगारी स्वरुप लक्षात घेवुन लोणी काळभोर पोलीसांनी त्याचा तडीपार प्रस्ताव पाठवून माहे जुलै २०२४ मध्ये त्यास पुणे जिल्हा बाहेर तडीपार केले होते.
परंतु सदर तडीपार आदेशाचा भंग करुन तो वारंवार लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने त्याचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणेचे दृष्टीने लोणी काळभोर पोलीस ठाणे मार्फत त्याचा एम.पी.डी.ए.प्रस्ताव पाठवीणेत आला होता. सदर प्रस्तावास मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी मान्यता दिली.
परंतु सदर एम.पी.डी.ए. प्रस्ताव मंजुर होताच शुभम संजय धुमाळ हा फरार होवुन स्वतः चे अस्तित्व लपवून कोठेतरी लपुन बसला होता. त्याने त्याचा मोबाईल व सर्व प्रकारचे संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता फरार कालावधीत त्याचे हातुन पुन्हा गंभिर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात येताच, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपीचा शोध घेणेकरीता स्वतंत्र पथक तयार करुन अहोरात्र आरोपीताचा मागोवा घेतला. अथक प्रयत्नानंतर लोणी काळभोर चे पथकास फरार आरोपी शुभम संजय धुमाळ याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. त्यानुसार सदर आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी दि. २४/०१/२०२५ रोजी पहाटे म्हातोबाची आळंदी जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरातुन ताब्यात घेतले आहे.
सदर अट्टल गुन्हेगारास लोणी काळभोर पोलीसांनी एम.पी.डी.ए. प्रास्तावानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात १ वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र पन्हाळे, पोउपनि अनिल जाधव, पो. अमंलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, भोसले, नरसाळे, ढमढेरे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले म.पो. अमंलदार भोसुरे, यांनी केली आहे.