अनेक ग्राहकांचे दागिने व पैसे घेवुन फसवणुक केलेल्या फरार ज्वेलर्स आरोपीला डोंबिवली पोलीसांनी राजस्थानातुन अटक

उपसंपादक – रणजित मस्के
डोंबिवली :- दिनांक:- ०१/०६/२०१८ ते ३०/०६/२०२२ या कालावधीत फिर्यादी श्रीमती मिनु प्रमोद गांधी वय: ५ वर्षे धंदा नोकरी रा.नवीन हनुमान मंदीराजवळ ठाकुर्ली पूर्व यांचे सह अन्य १५ बळीत सांक्षीदार यांचेकडुन आरोपीत नामे श्री सोहनसिंह चैनसिंह दसाना वय अ ५० वर्षे धंदा :- ज्वेलर्स रा. साईराज कुटीर दुसरा मजला, ९० फीट रोड, ठाकुर्ली पुर्व जि.ठाणे याने त्यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स, अंकीता नगरी हौसींग सोसायटी, लि.शॉप नं ०३, स्टेशन रोड, ठाकुर्ली पुर्व जि.ठाणे या ठिकाणी फिर्यादी तसेच इतर १५ बळीत साक्षीदार यांचेकडुन विश्वासाने दागिने घेवुन त्या मोबदल्यात लोन देतो असे सांगुन, तसेच दागिने बनविण्यासाठी आगाव रक्कम घेवून, कोणतेही दागिने बनवुन न देता घेतलेली रक्कम तसेच दागीने घेवुन फरार होवुन एकुण- ३१.५३,२२० /- रुपये किंमतीचे (रोख रक्कम व दागिने) ची फसवणुक म्हणून, डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद क:- ४०९ / २०२२ कलम ४२०, ४०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता.

नमुद गुन्हयाचा तपासा दरम्यान सपोनि सानप, पोहवा५०३ / वाघ, पो. हवा – १३०७ / सरनाईक, पोअ ८४२३ / सांगळे यांनी तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सदर आरोपीत हा थुरावड, बरकडा की भागल, तहसील-गटबोर, ठाणा:- चारभुजा राज्य:- राजस्थान या ठिकाणी असल्याची माहीती मिळवून, सदर आरोपीतास वरील नमुद पथकाने वरील नमुद ठिकाणावरून ताब्यात घेवुन डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क.- ४०९/२०२२ कलम ४२०, ४०६ भादवि मध्ये अटक केली.
अटक आरोपीतांचे नाव व पत्ता:-
सोहनसिंह चैनसिंह दसाना वय ५२वर्षे चंदा:- ज्वेलर्स गावचा पत्ता:–थुरावड बरकडा की भागल, तहसील-गटबोर, ठाणा:- चारभुजा राज्य:- राजस्थान
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर, पो.नि गुन्हे श्री तडवी सो यांचे मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा ५०३ / विशाल वाघ, पोहवा १३०७ प्रशांत सरनाईक, पो.अं. ८४१३/ नितीन सांगळे, पो.शि./३९९८ पाटील, पोहवा निसार पिंजारी/कोळसेवाडी पो.ठाणे यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com