जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हयातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दि.०५/०६/२००३ रोजी १९.३० वा.चे. सुमारास फिर्यादी मोटार सायकलवरून जात असताना जुनी उधारी

मागीतल्याचे कारणावरुन चिडून जावून तीन आरोपींनी फिर्यादीचे पाठीमागे येवून डाव्या बाजूचे खुच्यात चाकूने

भोकसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४५६/२०२३ मादधिक ३०७ २२२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू चॉगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्हयातील आरोपींना

ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक

तपास पथक तयार करून त्यांना गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

दि.१५/०६/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नमुद गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी हा पाढे फाटा परिसरात वावरत आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने पाढे फाटा परिसरात सापळा लावून आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी साई दाव्याचे समोर उभा असल्याचे आढळून आल्याने त्यास ताय्यात घेवून पुढील कार्यवाही कामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे नास्यात देण्यात आले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सूचनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, अमोल माने, दिपाली यादव, शिवाजी भिसे, केतन शिंदे, स्वप्नील दौड, वैभव सावंत, मोहसीन मोमीन यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट