अभिनव काॅलेजचे सन्मा.प्रा. माधव आग्री सर मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित..

प्रतिनिधी-मनोहर आगोंडे
मुंबई :-रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक या खेडेगावात एका शेतकरी कुणबी समाजात जन्मलेले प्राध्यापक माधव आग्री सर हे सध्या मुंबईतील भाईंदर पुर्व येथील अभिनव ज्युनियर कॉलेज येथे सुपरवायझर आहेत.


त्यानी सलग १६ वर्षे कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका रोहा मुंबईचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते सध्या कुणबी समाज विद्यालय म्हसाडी येथे शालेय समितीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मागील २० वर्षात त्यानी ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले असून म्हसाडी विद्यालयातील एकुण २५ विद्यार्थी त्यानी दत्तक म्हणून घेतले आहेत
राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्याना अशा अनेक पुरस्काराने सन्मानीत केले असून सन २०२४ ला त्याना एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अशा या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत ” दि वॉशिंग्टन डिजीटल युनिव्हर्सिटी ” युएसए तर्फे मानद डाॅक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे .अशा या शिक्षकाला सुरक्षा पोलीस टाइम्सचा मानाचा मुजरा..!
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com